बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात, जखमींना बार्शी,परंडा रुग्णालयात हलवले
आरंभ मराठी / धाराशिव
स्टेरिंग रॉड तुटल्याने बस झाडावर अजून चालक वाहकासह बारा विद्यार्थी जखमी झाले आहेत ही घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास परंडा तालुक्यातील सोनारी शिवारात घडली आहे. यातील जखमींना बार्शी तसेच परंडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक-वाहक गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस प्रवाशी विद्यार्थ्यांना घेऊन परंडाकडे जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार रोहकल ते परंडा जाणारी ही बस सोमवारी सकाळी कंडारी, सोनारी मार्गे विद्यार्थ्यांना घेऊन परंडाकडे जात होती. बसमध्ये बारावीचे विद्यार्थी प्रॅक्टिकलच्या पेपरसाठी जात होते.अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून बस बाजूच्या झाडावर आदळली.अपघातात चालक-वाहक तसेच बसमधील शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी जखमी झाले आहेत.
अपघातानंतर रोहकलचे सरपंच हनुमंत कोलते-पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी जखमी प्रवाशांना मदत केली. याबाबत कोलते पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, परंडा आगाराची ही बस रोहकल येथे मुक्कामी असते. सकाळी पावणे सात वाजता ही बस परंडाच्या दिशेने निघाली होती. कंडारी, सोनारी मार्गे प्रवासी घेऊन जाताना हरणवडा परिसरात स्टेरिंग रॉड तुटल्याने बस झाडावर आदळली.
जखमींना उपचारासाठी वर्षीच्या जगदाळे मामा रुग्णालयात तसेच परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.