• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 28, 2026
in Breaking, Exclusive
0
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला
0
SHARES
552
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिव येथे आज झालेल्या जाहीर सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा मी पंधरा वर्षे पोसला पण त्यानेच गद्दारी केली असे म्हणत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांची माफी मागितली.
मला ओमराजे पाहिजे होता, तर त्यांना खासदार पाहिजे होता. मी शेवटपर्यंत समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी गद्दारी केली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांचे कौतुक केले. २०२२ मध्ये पहिल्यांदा गद्दारी होत असताना आमदार कैलास पाटील यांनी खोक्यांना लाथ मारून गुजरातच्या सीमेवरून परत येत निष्ठा जपली, असे सांगत त्यांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

इथल्या खासदाराकडे हारामाचा पैसा होता म्हणून त्याने गद्दारी केली, पण निष्ठावान शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कष्टकरी शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या निवडणुकीसाठी एक-एक रुपया गोळा करून निष्ठेची लढाई लढण्यासाठी मदत केली होती. मात्र, त्या प्रत्येक मतदाराशी त्यांनी बेईमानी केली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. स्वतःचा फोन नंबर सर्वांना देणाऱ्या या खासदाराने माझा देखील फोन उचलला नाही.

वाघाचे कातडे पांघरलेला हा लांडगा आजपर्यंत पोसला, याचे आता वाईट वाटते, असे म्हणत त्यांनी ओमराजेंवर निशाणा साधला.
याची एक-एक प्रकरणे आता समोर येत आहेत. ती समोर आल्यानंतर याला उमेदवारी का दिली? याचाच पश्चात्ताप होत आहे, असे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

धाराशिवची ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या मातीत झाली असून ही गद्दारी तुम्हीच गाडून टाका, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. विकास निधीच्या नावाखाली केवळ नाटक करण्यात आले असून कारखान्यातील भ्रष्टाचार, पवनचक्की घोटाळा आणि इतर अनेक लफडी या खासदाराशी संबंधित असल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

खासदार ओमराजे यांना जपण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. अखेरच्या दिवसापर्यंत आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांना पाठवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांनी गद्दारी केली, असे ते म्हणाले. या खासदाराचे जे कारनामे समोर येत आहेत, ते ऐकल्यानंतर हा माणूस म्हणण्याच्या लायकीचाही राहिलेला नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिरालाच लुटणारी भाजप आता बाबर जनता पार्टी झाली आहे. महाराष्ट्र धर्म आणि मराठी अस्मिता संपवण्यासाठी गद्दार झालेले खासदार त्यांना मदत करत आहेत. एवढे करूनही ठाकरे संपणार नाहीत. गद्दारांच्या कितीही पिढ्या आल्या तरी ठाकरे आणि शिवसेना संपणार नाही. शिवसेना ही फक्त आमदार-खासदारांच्या संख्येने मोजली जात नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सहा खासदारांपैकी पाच जण तयार होते, मात्र ओमराजे हे भाव वाढवण्यासाठी अडून बसले होते.

जास्तीचे खोके मिळाल्यानंतरच इथला खासदार गद्दार झाला, असा आरोप करत त्यांनी गद्दारी करणाऱ्या प्रत्येकाला कायद्याच्या कचाट्यात अडकवणार, असा इशाराही दिला. पीकविमा, शेतमालाला हमीभाव यांसारखे प्रश्न विचारले की केंद्र सरकारकडून “जय श्रीराम” च्या घोषणा देऊन विषयाला बगल दिली जाते. स्वतःची पापे झाकण्यासाठी ही गद्दारी करण्यात आली. आतापर्यंत भावनेच्या राजकारणावर हा खासदार निवडून आला, मात्र आता मिंधे सेनेत गेल्यानंतर त्याला पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

भाषणाच्या शेवटी गद्दारांना संपवणारच असा शब्द देत ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. या सभेला खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार आदित्य ठाकरे, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

Next Post

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

Related Posts

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

June 29, 2026
Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

Breaking उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला; परीक्षा रद्द

June 27, 2026
Next Post
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

July 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group