• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 4, 2026
in क्राईम
0
कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
629
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / कळंब

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरालगत येरमाळा रस्त्यावरील पाझर तलाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व कळंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनच्या २९ प्लास्टिक पुड्या तसेच एक हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात एमडी या घातक अंमली पदार्थाची तरुणांमध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस यंत्रणेला मिळत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्ह्यांवर विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे पथकासह कळंब पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार निखिल युवराज जाधव (वय २४) व अरविंद दादाराव कांबळे (वय २४, दोघेही रा. कळंब, जि. धाराशिव) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी कळंब–येरमाळा रस्त्यावरील पाझर तलाव परिसरात येणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे एनडीपीएस कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करून फॉरेन्सिक पथक, पंच व पोलीस कर्मचाऱ्यांसह ४ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० ते ५.१९ या वेळेत पाझर तलाव परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून उभ्या असलेल्या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्या ताब्यातून पांढऱ्या स्फटिक स्वरूपातील ११.२१ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या २९ पारदर्शक प्लास्टिक पुड्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची अंदाजे किंमत ५५ हजार रुपये असून आरोपींकडील एमएच-२५ बीडी-४३४२ क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर दुचाकी (किंमत अंदाजे ५५ हजार रुपये) देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(सी) व २२(बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि मगर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि खटके, सपोनि मगर तसेच स्थानिक गुन्हे शाखा व कळंब पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरीत्या केली.

SendShareTweet
Previous Post

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

Next Post

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

Related Posts

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

August 12, 2026
दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

August 10, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

July 31, 2026
हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

July 14, 2026
Next Post
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील 'या' अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group