• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, November 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्हा पत्रकार संघाच्या शिबिरात १७७ जणांची तपासणी,आता दरवर्षी पत्रकार आणि त्यांच्या कुटुबियांसाठी तपासणी शिबिर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 7, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
258
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


जिल्हाधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे कौतुक, तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर


प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आणि पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी शनिवारी (दि.६) पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील तब्बल १७७ जणांची तपासणी करण्यात आली.यापुढे दरवर्षी पत्रकार आणि त्यांच्या कुटुबियांसाठी आरोग्य तपासणी करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.


शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, पल्स हॉस्पीटलचे संचालक डॉ. तानाजी लाकाळ, ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसुळ, कमलाकर कुलकर्णी, डॉ. रणजीत कदम, डॉ. वीरेंद्र गवळी, डॉ. विकास बाराते, डॉ. बालाजी लोमटे, डॉ. पवन महाजन आदींची उपस्थिती होती. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये रक्तदाब, थायरॉईड, शुगर लेवल, ईसीजे, हिमोग्लोबिन, हाडांची तपासणी, पोटाचे विकार, डोळे आदी आजाराबाबत १७७ जणांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, डॉ. वीरेंद्र गवळी, डॉ. बालाजी लोमटे, डॉ. विकास बाराते, डॉ. नितीन भोसले, डॉ. पवन महाजन यांनी तपासणी केली.
यावेळी पत्रकार संघाचे संघटक महेश पोतदार, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, पदाधिकारी रवी केसकर, चेतन धनुरे, बाबुराव चव्हाण, देवीदास पाठक, दिलीप पाठक-नारीकर, बालाजी निरफळ, सयाजी शेळके, तानाजी जाधवर, जी. बी.राजपूत, मच्छिंद्र कदम, आरिफ शेख, सुधीर पवार, प्रशांत कावरे, बाळासाहेब मुंदडा, शितलकुमार धोंगडे, अझर शेख, राकेश कुलकर्णी, प्रवीण पवार, विनोद बाकले, सुरज पाचपिंडे, किशोर माळी, अजित माळी, काकासाहेब कांबळे, संतोष शेटे, बाळासाहेब माने, प्रा. अभिमान हंगरकर, अमोल गाडे, शीतल वाघमारे, सलीम पठाण, आकाश नरुटे, विकास सूर्डी, संतोष जोशी, भाउसोब अणदूरकर, रियाज शेख, पांडूरंग मते, संजय शिंदे, शिवराज गव्हाणे, उमाजी गायकवाड, उमाकांत भुसारे, शाहरुख सय्यद, राजवर्धन भुसारे, इस्माईल सय्यद यांच्यासह जिल्हाभरातून पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्या यांची उपस्थिती होती.

पत्रकार संघाचे कौतुक
यावेळी प्रास्ताविकात अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी पत्रकार संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच पुढील काळातील केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर मार्गदर्शक अनंत अडसूळ यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाच्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी कौतुक केले. ते म्हणाले, पत्रकारांनी ताणतणावाच्या या काळात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून, अशा आरोग्य शिबिरातून आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले जात आहे, हे अत्यावश्यक आहे. पत्रकारांनी धावपळीच्या जीवनात सामाजिक, शारीरिक आरोग्यासोबतच आर्थिक आरोग्य देखील जपणं गरजेचं आहे, असे सांगितले.

जिल्हा पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी

या कार्यक्रमात पत्रकार संघाची जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची जिल्हाध्यक्षांच्या परवानगीने नियुक्ती करुन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये धाराशिव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, उमरगा तालुकाध्यक्ष अविनाश काळे, लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी बिराजदार, तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, कळंब तालुकाध्यक्ष पदसिद्ध-अशोक शिंदे, भूम तालुकाध्यक्ष प्रल्हाद अडागळे, परंडा तालुकाध्यक्ष आंनद खर्डेकर यांच्या निवडी करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.

पुढील वर्षीही पत्रकारांची आरोग्य तपासणी

या कार्यक्रमात पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. तानाजी लाकाळ यांनी पत्रकार व त्यांच्या कुटूंबासाठी पुढील वर्षीही असे शिबीर घेवून तपासणी करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे पुढील वर्षीही पत्रकारांसह त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची तपासणी होणार आहे.

SendShareTweet
Previous Post

लेडीज क्लबच्या प्रांगणात हिरकणी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ; आमदार पाटील म्हणाले, हिरकणी महोत्सव महिलांच्या हक्काचे व्यासपीठ

Next Post

कळंबमध्ये शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

Related Posts

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

October 30, 2026
तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
Next Post

कळंबमध्ये शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

निधी उपलब्ध; धाराशिव शहरातील विकास कामांना सुरूवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

November 3, 2026
धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

November 3, 2026
दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

October 30, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group