प्रतिनिधी / कळंब
आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कळंब पत्रकार भवन येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार व शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. दर्पण दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांचा सन्मान शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व पत्रकारांचा सन्मान शाल व पुष्पगुच्छ लेखणी देऊन शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी ईश्वर शिंदे,लक्षण हुलजुते,ॲड. मंदार मुळीक,उपजिल्हा प्रमुख अनंत वाघमारे, अविनाश खापे,गोविंद आवाड, बाळासाहेब हांगे, सोमनाथ वावरे, बाळासाहेब समुद्रे आदींसह पत्रकार सतीश टोणगे, सतीश मातणे, परमेश्वर पालकर,अकिब पटेल,संदीप कोकाटे, अमर चोंदे, माधवसिंह राजपूत, लक्ष्मण शिंदे, कोठावळे,दीपक माळी, महेश टेळे,सलमान मुल्ला, गजानन तोडकर आदी उपस्थित होते.