• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 11, 2025
in Breaking
0
0
SHARES
947
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात स्वच्छता, नियम पाळण्याची जबाबदारी असलेल्या काही पुजाऱ्यांनी बेजबाबदार वर्तन केल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे मंदिर संस्थानने संबंधित पुजाऱ्यांना मंदिर बंदीची नोटीस बजावली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आढळून आले आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत, देऊळ कवायत कलम २४ व २५ अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे.

पुजाऱ्यांचे वर्तन अशोभनीय

मंदिर प्रशासनाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, पुजारी व्यवसायास अशा प्रकारचे वर्तन शोभणारे नसून, मंदिर परिसरातील पावित्र्याला बाधा पोहोचवणारे आहे. यामुळे मंदिराचे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होत असून, शिस्तीचा भंग होत आहे.
नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्यास तीन महिन्यांची मंदिरप्रवेश बंदी घालण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

१. वैभव विशाल भोसले
२. विशाल दादासाहेब मगर
३. लखन रोहिदास भोसले
४. विशाल हनमंत चव्हाण
५. विशाल बाळासाहेब गंगणे
६. अक्षय किशोर कदम-भैय्ये
७. राहुल हनुमंत पवार
८. धीरज राजू चोपदार
_

वर्तन कसे असावे, धडे देण्याची वेळ ..?
श्री तुळजाभवानी मंदिर राज्यातील एक प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. अशा पवित्र जागी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणे हे अत्यंत अशोभनीय असून, भाविकांच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.

SendShareTweet
Previous Post

तुळजाभवानी मंदिर संस्थान पुण्यातील चितळेंची तुंबडी भरणार,

Next Post

धाराशिव आणि तुळजापूर बस स्थानकाच्या बोगस कामांची होणार चौकशी

Related Posts

Breaking पीकविमा रोखण्यासाठी विमा कंपनीचा नवा डाव; ३३६ कोटींच्या दाव्यावर केंद्रीय समितीकडे अपील

May 19, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

May 3, 2026

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

February 25, 2026

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

January 11, 2026

Breaking ५ हजारांची लाच घेताना समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

December 31, 2025
Next Post

धाराशिव आणि तुळजापूर बस स्थानकाच्या बोगस कामांची होणार चौकशी

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

ताज्या घडामोडी

अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला धमकावून टीप्पर चालक फरार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 27, 2026

मेडसिंगा पाटीजवळ भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

May 25, 2026

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group