• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, October 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजाभवानी मंदिर संस्थान पुण्यातील चितळेंची तुंबडी भरणार,

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 10, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
199
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

लाडूचा हट्ट कशासाठी, देवी भक्तांना पेढ्याचा प्रसाद का नाही ?
_
पेढ्यामुळे मिळेल जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी, स्थानिक व्यावसायिकांना रोजगार
_
पुण्यातील चितळेंच्या लाडूसाठी हट्ट कुणाचा ?

चंद्रसेन देशमुख /आरंभ मराठी

धाराशिव ; कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या भाविकांना प्रसाद म्हणून पुण्यातील चितळेंचे लाडू देण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. वास्तविक पाहता धाराशिव जिल्ह्यातील खवा आणि पेढे देशभरातील देवस्थानांमध्ये प्रसिद्ध असताना तुळजाभवानी मंदिरात पेढ्याऐवजी लाडूचा हट्ट कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यात दुग्ध आणि खवा उत्पादन मोठ्या प्रमाणात असताना तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना रोजगार वाढवणे शक्य असताना मंदिर संस्थानने पेढ्याऐवजी लाडूचा हट्ट कशासाठी धरला, अशी विचारणा होत आहे.

जिल्ह्यातील कुंथलगिरीचा पेढा देशात सर्वदूर पोहोचला आहे. या भागातील खवा आणि पेढ्याने भारतातील प्रत्येक देवस्थानातील बाजारपेठ काबीज केली आहे. चविष्ट खवा आणि पेढ्याने विशेषतः भूम- वाशी तालुक्याचे नाव सर्वत्र पोहोचवले असून,बहुतांश देवस्थानांकडून प्रसाद म्हणून याच भागातील खवा आणि पेढ्याचा उपयोग केला जातो.

केवळ भूम,वाशी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात तयार केलेला खवा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई, पुण्यासह वेगवेगळ्या महानगरात पाठवला जातो.उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात खवा क्लस्टर होत आहे. सरकारही या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे.

यामुळे अनेक शेतकऱ्याना जोडव्यवसायातून आर्थिक मदत होत आहे एवढेच नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांना देखील आर्थिक लाभ मिळत आहे. असे असताना तुळजाभवानी मंदिरात पेढ्याऐवजी लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर मतभिन्नता निर्माण झाली आहे. स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करण्याऐवजी मंदिर संस्थानने लाडूचा हट्ट कशासाठी धरला आहे,असा सवाल विचारला जात आहे.

मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना पुण्यातील चितळेंचे लाडू देण्यात येणार आहेत. त्यासाठी मंदिर संस्थान खर्च करणार आहे. वास्तविक पेढ्याऐवजी लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेतला तर स्थानिक दुग्ध उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक हातभार लागू शकतो. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार देखील मिळू शकतो.

मात्र,मंदिर संस्थानने लाडूचा हट्ट धरल्यास भाविकांच्या खिशातील पैसा जिल्ह्याबाहेर जाऊन रोजगाराच्या संधी बुडतील.कारण चितळे यांच्याकडून पुण्यातच लाडू तयार करण्यात येणार आहेत. मंदिर संस्थानने लाडूचा हट्ट सोडावा आणि भाविकांना पेढ्याचा प्रसाद देण्याचा निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.

उपवासाला लाडू नव्हे, पेढ्याचा प्रसाद हवा,

तुळजाभवानी मातेचे बहुतांश भाविक नवरात्रोत्सवात तसेच मंगळवार,शुक्रवार आणि पौर्णिमेला उपवास धरतात. मात्र, उपवासाला डाळीच्या पिठाचे लाडू प्रसाद म्हणून सेवन करता येत नाहीत. पेढ्याचा प्रसाद उपवासादिवशी सेवन करता येतो.त्यामुळे पेढ्याचा प्रसाद कोणत्याही दिवशी चालू शकतो. मंदिर संस्थानने लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पातळीवर पुजारी, व्यापारी आणि नागरिकांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

आपल्या भागाची ओळख वाढवा, लाडू नको पेढ्याचा प्रसाद हवा,

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रसाद म्हणून लाडू देण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कोणत्या तरी मंदिरातील कॉपी करण्यापेक्षा आपण आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी. पेढा उत्पादन ही धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे.ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. त्यासाठी मंदिर संस्थानने पुढाकार घ्यावा. लाडूऐवजी भाविकांना पेढ्याचा प्रसाद दिल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि आपला जिल्हा करत असलेल्या उत्पादनाचा देशभर लौकिक वाढेल.
-नागनाथ भांजी,
पुजारी,तुळजापूर

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#tuljapur#tempal#tuljapurtempal#tuljabhavani#food
SendShareTweet
Previous Post

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

Next Post

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

धाराशिव आणि तुळजापूर बस स्थानकाच्या बोगस कामांची होणार चौकशी

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group