• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 3, 2026
in Breaking
0
0
SHARES
4.8k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

शहरातील दीपक चौक परिसरात घडलेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या रक्तरंजित घटनेत 19 वर्षीय युवकाचा जीव गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत युवकाचे नाव कृष्णा आनंत रसाळ (वय 19, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 मेच्या रात्री ते 3 मेच्या पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास दीपक चौक येथे कृष्णा व एका अज्ञात व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला सामान्य भांडण वाटणारा हा वाद अचानक विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले.

वादाच्या भरात अज्ञात हल्लेखोराने संतापाच्या भरात धारदार शस्त्र काढून कृष्णा रसाळ यांच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कृष्णा मदतीसाठी झुंज देत होते. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

जखमी अवस्थेत कृष्णा यांना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी वेळ न दवडता त्यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तस्त्रावामुळे दिनांक 3 मे रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान कृष्णा रसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार बालाजी कामतकर व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वादाचे मूळ कारण काय होते, हल्लेखोर कोण आहे, तसेच कोणत्या प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी फरार असल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

SendShareTweet
Previous Post

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

Next Post

.. अखेर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Related Posts

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
Next Post

.. अखेर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोणत्या जन्माची चूक भोगत आहेत धाराशिवकर ..?

ताज्या घडामोडी

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group