• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 29, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील अखेर विजयी घोषित; ‘इतक्या’ मतांनी केली मात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 29, 2026
in राजकारण
0
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील अखेर विजयी घोषित; ‘इतक्या’ मतांनी केली मात
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना अखेर ४५ तासांच्या मतमोजणीनंतर पहाटे पाच वाजता विजयी घोषित करण्यात आले. डॉ पाटील यांनी १८ हजार १२४ मतांच्या फरकाने विजय मिळविला. डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. गुरुवारी (दि. २९) पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी.

श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित करून विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर ही निवडणूक झाली. एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती.
मतमोजणीच्या प्रारंभी मतपत्रिकांची पडताळणी व वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण झाली.

एकूण १ लाख ७७ हजार ११५ मते वैध, तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब साबळे-पाटील यांना १९ हजार ८३५, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. मात्र, कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. विजयाचा कोटा पूर्ण न झाल्याने निवडणूक नियमांनुसार सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने वगळून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात आली.
दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांना, तर १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांना हस्तांतरित झाली. त्यानंतर ३९व्या वगळणीच्या टप्प्यात रविराज साबळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून ६ हजार ४६९ मते डॉ. पाटील यांना, तर ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना मिळाली. एकूण ४१ उमेदवारांपैकी ३९ उमेदवारांची वगळणी झाल्यानंतर डॉ.

प्रतापसिंह पाटील आणि सतीश चव्हाण हे दोन उमेदवार शिल्लक राहिले. या टप्प्यावरही दोघांपैकी कोणालाही निश्चित मतांचा कोटा गाठता आला नाही. अखेरच्या मतमोजणीत डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. त्यामुळे डॉ. पाटील यांनी १८ हजार १२४ मतांच्या मताधिक्याने विजय मिळविला. मंगळवारी (दि. २७) सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवारी (दि. २९) पहाटे अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत सलग ४५ तासांहून अधिक काळ सुरू होती.

SendShareTweet
Previous Post

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांची २३ हजार मतांची आघाडी; पहिल्या तीन क्रमांकांवरील उमेदवार धाराशिवचे

Related Posts

October 28, 2026
कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026
ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

October 5, 2026
..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026

ताज्या घडामोडी

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील अखेर विजयी घोषित; ‘इतक्या’ मतांनी केली मात

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील अखेर विजयी घोषित; ‘इतक्या’ मतांनी केली मात

October 29, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांची २३ हजार मतांची आघाडी; पहिल्या तीन क्रमांकांवरील उमेदवार धाराशिवचे

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांची २३ हजार मतांची आघाडी; पहिल्या तीन क्रमांकांवरील उमेदवार धाराशिवचे

October 28, 2026
गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

October 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group