• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, June 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 10, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

बेंबळी येथील स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (दि.९) दुपारी झालेल्या भीषण अपघातात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तथा बीएलओ गोविंद भैरु इंगळे (वय ५०, रा. कनगरा, सध्या साळुंके नगर, धाराशिव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकाची चूक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

कारचालकाने निष्काळजीपणे राँग साईडने भरधाव कार चालवल्यामुळे हा अपघात झाला आहे. संबंधित कारचालकाविरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. पांडुरंग भैरुनाथ इंगळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत गोविंद इंगळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच ते बीएलओचे कामही करत होते. शुक्रवारी सकाळी ते बेंबळी येथील गणेशनगर परिसरात बीएलओच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी गेले होते.

दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कुटी (MH 25 BC 2284) वरून गणेशनगरहून जात असताना बेंबळी-धाराशिव मार्गावर स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. फिर्यादीनुसार, धाराशिवकडून बेंबळीकडे येणारी किया कंपनीची काळ्या रंगाच्या सोनेट कारने (MH 25 AS 7776) भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने येऊन गोविंद इंगळे यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर स्कुटी रस्त्याच्या कडेला १० ते १५ फूट अंतरावर फेकली गेली, तर कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन स्वराज्य पानटपरी व शिवम टायर वर्क्स या दुकानांमध्ये घुसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अपघातानंतर स्थानिकांनी गंभीर जखमी अवस्थेत गोविंद इंगळे यांना ग्रामीण रुग्णालय बेंबळी येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरीराला गंभीर दुखापती झाल्या होत्या. उजवा पाय घोट्यापासून मांडीपर्यंत चेंदामेंदा झाला होता, डाव्या पायाला गंभीर जखम होती तसेच डोक्याला व पाठीमागील भागाला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेचे प्रत्यक्षदर्शी म्हणून अभिजीत बाबासाहेब इंगळे व सुरज दादाराव इंगळे यांनी कारचालक दिनेश धोंडिराम हेड्डा (रा. बेंबळी) हा भरधाव वेगात व राँग साईडने वाहन चालवत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या अपघाताचा मोठा धक्का इंगळे परिवाराला बसला असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी इंगळे परिवाराने केली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Teacher#speeding#car#wrong#case#registered#driver#accident#Road
SendShareTweet
Previous Post

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

Next Post

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

ताज्या घडामोडी

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group