• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 11, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
3.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. शासनाच्या दि. ०४ मे २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षण संख्येमध्ये बदल करण्यात आल्याने धाराशिव तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा नव्याने काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी दि. १० जुलै २०२५ रोजी धाराशिव तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र शासनाने दि. ३० एप्रिल २०२६ रोजी केलेल्या बदलानंतर ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील जागांच्या संख्येत फेरबदल करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त ओबीसीची एक जागा कमी करून खुल्या प्रवर्गात एक जागा वाढविण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील एकूण ६२१ ग्रामपंचायतींसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार सरपंच पदासाठी अनुसूचित जातीसाठी १००, अनुसूचित जमातीसाठी १३, ओबीसीसाठी १६८ आणि खुल्या प्रवर्गासाठी ३४० जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. नव्या बदलानंतर ओबीसीच्या जागा १६७ वर आल्या असून खुल्या प्रवर्गाच्या जागा ३४१ झाल्या आहेत.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी धाराशिव तालुक्यात सर्वाधिक ११० ग्रामपंचायती असल्याने या बदलाचा सर्वाधिक परिणाम धाराशिव तालुक्यावर झाला आहे. यापूर्वी तालुक्यात अनुसूचित जातीसाठी १९, अनुसूचित जमातीसाठी ४, ओबीसीसाठी ३० आणि खुल्या प्रवर्गासाठी ५७ जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. मात्र नव्या आदेशानुसार ओबीसीची एक जागा कमी होऊन ती संख्या २९ वर आली असून खुल्या प्रवर्गाच्या जागा ५८ झाल्या आहेत.

त्यामुळे धाराशिव तालुक्यातील केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग या दोन गटांसाठी सरपंच पदाची नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिव येथे पार पडणार आहे. या निर्णयाचा परिणाम तालुक्यातील केवळ दोनच गावांवर होणार आहे. परंतु ती दोन गावे कोणती असतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

नुकतीच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने गावागावांत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होऊन जवळपास दहा महिने उलटले असून अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र अचानक दोन जागांची पुन्हा नव्याने आरक्षण सोडत जाहीर झाल्याने अनेकांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता १८ मे रोजी होणाऱ्या या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Sarpanch#post#reservation#OBC#open
SendShareTweet
Previous Post

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

Next Post

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group