• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी सहा बालविवाह रोखले; एकाच गावात होणार होते तीन बालविवाह

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
649
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महिला व बाल विकास विभागाने बालविवाह रोखण्यासाठी अक्षय तृतीयेपासून विशेष मोहीम सुरू केली असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत बुधवारी (दि.६ मे) एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल ६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले. विशेष म्हणजे, भूम तालुक्यातील वाकवड येथे एकाच गावात तीन बालविवाह होणार होते.

मात्र प्रशासनाची टीम वेळेत दाखल झाल्याने हे विवाह थांबविण्यात आले. महिला व बाल विकास विभागाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे गेल्या तीन आठवड्यांत जिल्ह्यात एकूण ११ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील मोजे वाकवड आणि आंबी येथे एकूण चार बालविवाह होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

त्यानुसार महिला व बाल विकास विभाग, पोलिस प्रशासन आणि बालसंरक्षण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वाकवड परिसर डोंगराळ भागात असल्याने पथकाच्या गाड्या थेट गावापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पायी चालत जाऊन संबंधितांची घरे शोधावी लागली.

परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क साधण्यासही मोठ्या अडचणी आल्या. गावातील काही नागरिकांचे सहकार्य न मिळाल्यामुळे मुली व त्यांच्या पालकांचा शोध घेणे कठीण झाले. तथापि, पोलिस प्रशासनाने संबंधित मुली व त्यांच्या पालकांना ताब्यात घेऊन त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्याचे निर्देश दिले. वाकवड ग्रामपंचायतसमोर हे तीन विवाह नियोजित होते. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दिवसभरात एकही विवाह होऊ देण्यात आला नाही.

भूम तालुक्यातील आंबी येथे होणारा एक बालविवाहही प्रशासनाने रोखला. याशिवाय उमरगा शहरात एक आणि तुळजापूर तालुक्यातील वडगाव देवसिंगा येथे एक अशा एकूण ६ बालविवाहांवर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, भूम, उमरगा व तुळजापूर तालुक्यांतील महिला व बालकल्याण अधिकारी, संबंधित पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, बालसंरक्षण अधिकारी विभावरी खुणे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण, अमर भोसले, शारदा गंडले (समुपदेशिका), तसेच वन स्टॉप सेंटरचे श्रीकांत साठे यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागात अजूनही अज्ञान, परंपरा आणि सामाजिक दबावामुळे बालविवाहाचे प्रकार घडत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#marriages#Dharashiv#district#child#marriages#place#village
SendShareTweet
Previous Post

भटक्या कुत्र्यांनंतर आता डुकरांवर कारवाई; मोकाट जनावरांविरोधात पालिकेची मोहीम

Next Post

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांनी धाराशिव हादरले

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांनी धाराशिव हादरले

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्य नियुक्ती प्रक्रियेसाठी तीन महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group