• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, October 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लोकसभेला बाहेरचा उमेदवार कोण..? महायुतीच्या मेळाव्यानंतर कुणकुण; कुणाला फायदा,कोण अस्वस्थ..?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 15, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
631
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने काल धाराशिव येथे मेळावा घेऊन घटक पक्षांसोबत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत, आमदार राणा पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महायुतीतील छोट्या-मोठ्या सर्व घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यात पालकमंत्री सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट टीका करताना, त्यांना आत्ताच माजी खासदार असे संबोधून ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असे सांगितले. पडलेल्या आमदाराला मी खासदार केले होते, ती चूक होती हेही त्यांनी भाषणात सांगितले.तर बाहेरचा उमेदवार चालणार नाही हेही त्यांनी निक्षून सांगितले. वास्तविक हा बाहेरचा उमेदवार कोण,याचीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

महायुतीच्या मेळाव्यात मंचावरील नेते पाहिले तर महायुतीची प्रचंड मोठी ताकद दिसून येते. जिल्ह्यातील आर्थिक क्षमता असणारे सर्व मोठे नेते महायुतीकडे असल्याचे दिसून येते. परंतु महायुतीचा उमेदवार कोण? हे अजूनही ठरलेले नसल्यामुळे सध्या संभ्रमाची स्थिती दिसत आहे. महायुतीच्या प्रमुख तीनही पक्षांचा धाराशिवच्या जागेसाठी आग्रह आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर सोशल मीडियावर आताच झळकत आहेत. महायुतीमध्ये ही जागा कुणाला सुटणार हे अजूनही ठरलेले नसताना शिंदे गटाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. भाजपा देखील या जागेसाठी आग्रही आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून लढलेले आमदार राणा पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपला ही जागा हवी आहे. परंतु राणा पाटील स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहेत का? याबद्दल शंका आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या जागेवर दावा केला असला तरी लोकसभा निवडणुकीसाठी तेवढ्या ताकदीचा उमेदवार राष्ट्रवादीकडे दिसत नाही. एकूणच महायुतीच्या मेळाव्यात राजकीय ताकद दिसत असली तरी निवडणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास परिस्थिती फारशी बरी दिसत नाही.


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे दोनच महिने हातात असताना महायुतीमध्ये ही जागा कोणता पक्ष लढवणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षातील एकही नेता लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. धाराशिव लोकसभेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कालच्या मेळाव्यात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते. परंतु औशाचे आमदार अभिमयू पवार उपस्थित नव्हते. या दोन्ही तालुक्यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. महायुतीच्या मेळाव्यात सर्व घटक पक्षांचे नेते मांडीला मांडी लावून बसलेले दिसत असले तरी उमेदवारी जाहीर झाल्यावर ही एकी कितपत टिकेल, याबद्दल शंका येते. आमदार राणा पाटील आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि सुरेश बिराजदार वर्षानुवर्षे एकमेकांचे विरोधक राहिलेले आहेत. स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर करणारे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. त्यांना संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहिले जात नाही. अशावेळी ते कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल. नाही म्हटले तरी रवींद्र गायकवाड यांचा स्वतःचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे.
दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्याचे जवळपास निश्चित झालेले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हेच पुन्हा एकदा उमेदवार असतील हे ही निश्चित आहे. त्या दृष्टीने ओमराजेंनी मागच्या सहा महिन्यापासूनच लोकसभेची तयारी सुरू केल्याचे दिसून येते. दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील लोकांशी जोडलेली नाळ ही ओमराजेंनी ताकद आहे. सामान्यातील सामान्य माणूसही ओमराजेंनी कधीही आणि कुठेही भेटू शकतो, आणि आपली समस्या सांगू शकतो. लोकांनी मांडलेल्या समस्येचे निराकरण झाले अथवा नाही यापेक्षा खासदार स्वतः होऊन आपली समस्या ऐकून घेतो, आपला फोन उचलतो ही बाब लोकांसाठी समाधानाची असते. लोकांचे हे समाधान हीच ओमराजेंनी ताकद आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील ज्याप्रकारे निष्ठेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे त्यांचे नाव राज्यभर गाजले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला मानणारा पारंपारिक शिवसेनेचा मतदार खूप मोठ्या संख्येने धाराशिव जिल्ह्यात आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर हा मतदार दुसरीकडे गेला असेल ही शक्यता फार कमी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट जिल्ह्यात आजही दिसून येते. याच लाटेवर स्वार होऊन आपण जिंकू शकतो हा विश्वास ओमराजेंना वाटतो.
२०२० पासून पीकविम्याचा प्रश्न हा जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय कळीचा मुद्दा आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून ओमराजे एक वर्षापासून वारंवार पीक विम्याच्या मुद्द्यांवर आणि मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करत आहेत. पीएम किसान योजनेचे जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त लाभार्थी मागच्या दोन वर्षात वगळले गेलेले आहेत. सततच्या पावसाचे अनुदान, २०२० पासूनच्या प्रलंबित पिकविम्याचे हप्ते, शेतमालाला विशेषतः सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळणे, कांदा निर्यात बंदी या मुद्द्यांवरून मोदी सरकार विरोधात ओमराजेंनी मागच्या एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात रान उठवलेले आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने एक लाखाच्या आसपास मते मिळवली होती.

यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची ताकद उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे त्याचा फायदा ओमराजेंना होऊ शकतो. सध्या महायुतीच्या तुलनेत इंडिया आघाडीचे ओमराजे आघाडीवर दिसत असले तरी मागच्या वेळी त्यांच्यासोबत असणारी मोदी लाट आणि डॉ .तानाजी सावंत यांची आर्थिक ताकद यावेळी त्यांच्या विरोधात असणार आहे, हे विसरून चालणार नाही. धाराशिव जिल्ह्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षात योग्य समन्वय दिसून येत आहे. महायुतीची जागा कोणत्या पक्षाला सुटणार, हेच अजून ठरलेले नसल्यामुळे महायुतीची एकजूट कितपत टिकणार हे आताच सांगता येणार नाही. भाजपने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये ओमराजेंच्या बाजूने जनमत असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपा स्वतः ही जागा न लढवता, शिंदे गटाला ही जागा देऊ शकते आणि ही शक्यता जास्त वाटते. महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघापैकी धाराशिव लोकसभा निवडणूक ही कांटे की टक्कर असणार आहे. पुढील काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.


– सज्जन यादव,धाराशिव

SendShareTweet
Previous Post

अणदूररत्न पुरस्काराने 9 जण सन्मानीत; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून कौतुकाची थाप

Next Post

2 लाख बांधवांच्या उपस्थितीत 24 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा; छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरांसह 20 नेत्यांचे मार्गदर्शन

Related Posts

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
Next Post

2 लाख बांधवांच्या उपस्थितीत 24 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा; छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरांसह 20 नेत्यांचे मार्गदर्शन

पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group