• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 12, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील कळंब पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत एका पोलिस कर्मचाऱ्याला ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.११ मे) कळंब शहरातील होळकर चौकातून तांदुळवाडी मार्गावर असलेल्या गुलमोहर बिर्याणी हाऊससमोर करण्यात आली.

याप्रकरणी अशोक दादाराव करवर (वय ३४, पोलिस अंमलदार, बक्कल नं. ४१७, पोलीस स्टेशन कळंब) याला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी सिद्धेश्वर प्रकाश शिंदे (वय ३७, पोलिस अंमलदार, बक्कल नं. १३८९) याचा शोध सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा कळंब येथे रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आरोपी पोलिस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे यांनी पोलिस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये, तर अशोक करवर यांनी दुय्यम अधिकाऱ्यासाठी २० हजार रुपये अशा एकूण ४० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती.

तक्रारदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता, अधिकाऱ्यांना भेटलात तर तुमचा स्पा व्यवसाय बंद करून कारवाई केली जाईल, अशी धमकी देत दोन्ही आरोपींनी जे काही बोलायचे असेल ते आमच्याशीच बोला, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत तक्रारदाराने १० मे रोजी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष ३६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. दि.११ मे रोजी तक्रारदाराकडून ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अशोक करवर याला तक्रारदाराच्या स्विफ्ट कारमध्ये रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या अंगझडतीत ३६ हजार रुपयांची लाचेची रक्कम, ३५० रुपये रोख, एक मोबाईल, कार व मोटारसायकलच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोबाईल जप्तीची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींच्या घरझडतीची कारवाईही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी अशोक करवर याला गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक करण्यात येणार आहे.

ही कारवाई बाळू संपती जाधवर, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विजय वगरे हे करत आहेत. या कारवाईस पोहेकॉ गजानन घायवट, पोलिस अंमलदार मनोहर भुतेकर, गणेश चेके, संदीपान लहाने, गजानन कांबळे व चालक भालचंद्र बिनोरकर यांनी सहकार्य केले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#department#police#Kalamb#station
SendShareTweet
Previous Post

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

Next Post

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

... अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group