• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 7, 2026
in महाराष्ट्र
0
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये
0
SHARES
450
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील २०२५-२६ मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत झालेल्या तब्बल २१ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. चौकशीत मृत, भूमिहीन, दुबार आणि बिगर सभासद लाभार्थ्यांच्या नावावर कृषी साहित्य वाटप, अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर लाभ दाखविणे तसेच बनावट बिले काढून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, चौकशीत १९ जणांची नावे समोर आली असताना केवळ १५ जणांवरच कारवाई झाल्याने उर्वरित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.
————————–

धाराशिव जिल्ह्यातील २०२५-२६ मधील कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत २ जिल्हा कृषी अधीक्षक, ८ तालुका कृषी अधिकारी आणि ४ मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लातूर जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी सादर केलेल्या ७६ पानी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चौकशीत मयत, भूमिहीन, दुबार आणि बिगर सभासद लाभार्थ्यांच्या नावावर कृषी निविष्ठांचे वाटप झाल्याचे समोर आले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी या प्रकरणातील १५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाणे, बीजप्रक्रिया औषधे आणि इतर कृषी निविष्ठांचे वाटप करण्याची शासनाची योजना आहे. मात्र, २०२५-२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी १२ एप्रिल २०२६ रोजी कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. सुरुवातीला १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाऊन हा घोटाळा २१ कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले होते.
यानंतर आमदार कैलास पाटील यांनी १ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ‘दैनिक ‘आरंभ मराठी’ने या घोटाळ्याची सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली होती.

चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर –

या घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अर्जच न केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर लाभ दाखविणे, मृत शेतकऱ्यांच्या नावाने कृषी साहित्य वितरित झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करणे, प्रत्यक्ष लाभ न देता बनावट बिले उचलणे, तसेच शेतीच नसलेल्या व्यक्तींना लाभार्थी दाखविणे असे गंभीर प्रकार उघड झाले.
माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ४०० शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री कृषी साहित्य वितरित दाखवून सुमारे २१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

सुरुवातीला १९ जणांवर संशय –

या प्रकरणातील चौकशीत तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आठ तालुका कृषी अधिकारी, एका मंडळ कृषी अधिकाऱ्यासह १९ जणांचा सहभाग आढळल्याचे समोर आले होते. त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, यामध्ये संशयित असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे हे ३१ जुलै रोजी नियत वयोमानामुळे निवृत्त झाल्यामुळे या प्रकरणात १८ जणांची नावे समोर आली होती. या प्रकरणात १९ जणांची नावे असताना केवळ १५ जणांवरच कारवाई केल्यामुळे उर्वरित चार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
एक आठवड्यापूर्वी निवृत्त –

याप्रकरणी कारवाईला विलंब होत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्या निवृत्तीपूर्वीच यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. मात्र, या मागणीची दखल न घेतल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कृषी आयुक्तालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात १५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
–
चौकशीत जबाबदार धरलेले वरिष्ठ अधिकारी –

१) पुरुषोत्तम वाघमारे – प्रभारी कृषी उपसंचालक
२) राजकुमार मोरे – जिल्हा कृषी अधीक्षक
३) महादेव असलकर – तत्कालीन प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी
४) राहुल दिवाणे – तंत्र अधिकारी
५) राहुल सूर्यवंशी – सहायक कृषी अधिकारी
–

कारवाई झालेले तालुका कृषी अधिकारी –

१) राजाराम बर्वे – तालुका कृषी अधिकारी, वाशी
२) अतुल ढवळे – तालुका कृषी अधिकारी, भूम
३) नानासाहेब लांडगे – तालुका कृषी अधिकारी, परंडा
४) भागवत सरडे – तालुका कृषी अधिकारी, कळंब
५) महेश देवकते – तालुका कृषी अधिकारी, लोहारा
६) ज्ञानोबा रितापुरे – तालुका कृषी अधिकारी, उमरगा
७) आबासाहेब देशमुख – तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर
–

कारवाई झालेले मंडळ कृषी अधिकारी –

१) श्रीमती पल्लवी मच्छिंद्र काटकर – मंडळ कृषी अधिकारी, अणदूर
२) विठ्ठल गोविंद नागटिळक – मंडळ कृषी अधिकारी, काटी
३) सत्यजीत गजेंद्र देशमुख – मंडळ कृषी अधिकारी, नळदुर्ग
४) अमित अशोक भोसले – मंडळ कृषी अधिकारी, तुळजापूर

SendShareTweet
Previous Post

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

Next Post

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

Related Posts

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

Martha Reservation कुणबी संदर्भात धाराशिवच्या समितीला हैद्राबादमधून मिळाले महत्वाचे दस्तावेज, तत्काळ निर्णय घ्या

September 22, 2024

Vidhan Parishad Award मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी विधान परिषद गाजवलेल्या माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार

September 4, 2024
Next Post
दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी 'नासा'ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group