• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, September 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन
0
SHARES
1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत २०२५-२६ या वर्षात धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या कृषी निविष्ठांमध्ये झालेल्या २१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी या प्रकरणातील १५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. निलंबित अधिकाऱ्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी या कारवाईमुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाणे, बीजप्रक्रिया औषधे आणि इतर कृषी निविष्ठांचे वाटप करण्याची शासनाची योजना आहे. मात्र, २०२५-२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी १२ एप्रिल २०२६ रोजी कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. सुरुवातीला १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाऊन हा घोटाळा २१ कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले होते.
यानंतर आमदार कैलास पाटील यांनी १ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दैनिक आरंभ मराठीने या घोटाळ्याचा पाठपुरावा करत प्रकरणाला वाचा फोडली होती. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अर्जच न केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर लाभ दाखविणे, मृत शेतकऱ्यांच्या नावाने कृषी साहित्य वितरित झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करणे, प्रत्यक्ष लाभ न देता बनावट बिले उचलणे, तसेच शेतीच नसलेल्या व्यक्तींना लाभार्थी दाखविणे असे गंभीर प्रकार उघड झाले. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ४०० शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री कृषी साहित्य वितरित दाखवून सुमारे २१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
या प्रकरणातील चौकशीत तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आठ तालुका कृषी अधिकारी, एका मंडळ कृषी अधिकाऱ्यासह एकूण १७ जणांचा सहभाग आढळल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, कारवाईला विलंब होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी कृषी आयुक्तालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात १५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांची नावे अजून समोर आलेली नाहीत.

SendShareTweet
Previous Post

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

Next Post

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024
Next Post
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील 'या' अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

ताज्या घडामोडी

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 19, 2026
शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

September 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group