• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 16, 2026
in धाराशिव जिल्हा
0
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
0
SHARES
566
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून अवघ्या १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदविला. मात्र, हा विक्रम केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता लावलेली प्रत्येक रोपे जगविण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. “आपण विक्रम तर केलाच; पण त्यापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया,” असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. धाराशिवजवळील शिंगोली येथील वन विभागाच्या जागेसह जिल्ह्यातील आठ ठिकाणी १४ ऑगस्ट रोजी ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत तब्बल १० लाख ११ हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. या विक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. यानिमित्त शिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सरनाईक बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड, अभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, लेखक अरविंद जगताप आणि शिंगोलीच्या सरपंच योगिता शिंदे आदी उपस्थित होते. ‘एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशातून प्रेरणा घेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ देत धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्यात येत आहे. ‘हरित धाराशिव अभियान १.०’मध्ये १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी १७ लाख १ हजार ८१५ वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. यातील ८६.९७ टक्के रोपे जिवंत राहिल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.
‘हरित धाराशिव २.०’मध्ये जिल्ह्यातील आठ ठिकाणी ८३.२६ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने घनवन विकसित केले जात आहे. प्रत्येक रोपाला स्वतंत्र QR कोड देऊन डिजिटल नोंद करण्यात आली असून छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ड्रोन शूटिंग आणि हस्तलिखित लॉगबुकच्या माध्यमातून लागवडीची अचूक नोंद ठेवण्यात आली. अभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी युवा वर्गाने पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “माणूस जगातून जाताना काहीही सोबत घेऊन जात नाही; मात्र अन्न आणि श्वास झाडांपासूनच मिळतो,” असे सांगत प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयाएवढी झाडे लावावीत, असे त्यांनी आवाहन केले. देशी वृक्षांच्या लागवडीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ४० हून अधिक रोपवाटिकांमधून रोपे तयार करण्यात आली. १२ तासांत १० लाख वृक्षलागवडीची मोहीम जिल्हा प्रशासनासोबतच सेवाभावी संस्था, विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवक आणि विविध कंपन्यांच्या सहकार्याने यशस्वी झाली. यासाठी २४ वनस्पतिशास्त्रज्ञ, स्वतंत्र निरीक्षक आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. धाराशिवमध्ये केवळ ०.१ टक्के वनक्षेत्र असून ते वाढविण्याची गरज आहे. मागील वर्षी लावलेल्या १५ लाख वृक्षांपैकी १३ लाख झाडे जिवंत असल्याचेही पुजार यांनी सांगितले. जिल्ह्यात देवराई प्रकल्प उभारून वनक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत १२ तासांत १० लाख वृक्षलागवड पूर्ण केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
कार्यक्रमात अभियानासाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री सरनाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

Next Post

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

Related Posts

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026
Next Post
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group