• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खरीप आढावा बैठकीत २२ कोटींच्या योजनेची माहिती लपवली; आमदार कैलास पाटील यांनी कृषी विभागाचे काढले वाभाडे

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 1, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
858
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज (दि.१) पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कृषी विभागाकडून सादर करण्यात येत असलेल्या पीपीटी प्रेझेंटेशनदरम्यान आमदार पाटील यांनी खरीप २०२५ मध्ये शेतकरी गटांना वितरित करण्यात आलेल्या कृषी निविष्ठांबाबत सविस्तर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्याकडे मागितली. मात्र, संबंधित माहिती उपलब्ध नसल्याचे मोरे यांनी सांगितल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे या योजनेवर मागील खरीप हंगामात तब्बल २२ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची बाब समोर आली. ज्या योजनेसाठी इतका मोठा निधी खर्च केला जातो, त्या योजनेची माहितीच आढावा बैठकीत उपलब्ध नसणे गंभीर आहे. अशा योजना शेतकऱ्यांपर्यंत खरोखर पोहोचतात का? असा थेट सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.मात्र, एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळू शकले नाही.

यावेळी आमदार पाटील यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. शेतकरी गटांना कृषी निविष्ठा किटमध्ये केवळ बियाण्यांचे वाटप केले जाते, तर इतर साहित्य वितरित केले जात नाही. मात्र, संपूर्ण किटचे बिल मात्र वेळेवर काढले जाते, असा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांसमोरच केला. भूम येथील एका गोडाऊनमध्ये मागील आठवड्यात खरीप हंगामातील बियाण्यांचा साठा आढळून आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यामुळे वितरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक योजनेचे ‘चावडी वाचन’ करण्यात यावे, तसेच लाभार्थ्यांच्या याद्या सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. दरम्यान, आमदार राणा पाटील यांनी सोमवारपर्यंत शेतकरी गटांना वितरित करण्यात आलेल्या साहित्याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

बैठकीदरम्यान उमरगा, लोहारा, कळंब आणि वाशी येथील तालुका कृषी अधिकारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येताच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचतो का, याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#crore#Kharifreview#meeting#MLA#KailasPatil#agriculture
SendShareTweet
Previous Post

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group