• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 1, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
634
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या 151 फुटी भगवा ध्वज प्रकल्पाच्या कामात झालेल्या विलंबावरून प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर नाराजी व्यक्त करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकल्पासाठी सुमारे 90 लाख रुपयांचा निधी पालकमंत्री सरनाईक यांनी मंजूर केला होता. 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने या भगव्या ध्वजाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण करून 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीनिमित्त उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर काही व्यक्ती आणि संघटनांनी या प्रकल्पात अडथळे निर्माण केल्याचे समोर आले. त्यामुळे काम रखडले आणि नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. नंतर उद्घाटनाची तारीख 1 मे ठेवण्यात आली होती, मात्र काम अपूर्ण असल्यामुळे तेही होऊ शकले नाही.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेत आला असता, मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी काही व्यक्तींनी ठेकेदाराला काम थांबवण्यास सांगितल्याचे मान्य केले. यावर पालकमंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अशा अडथळा आणणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले. याचवेळी, धक्कादायक बाब म्हणजे प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला 90 लाखांपैकी तब्बल 57 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंधारे यांनी दिली.

यामुळे कामाच्या प्रगतीबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, प्रशासनाने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

SendShareTweet
Previous Post

खरीप आढावा बैठकीत २२ कोटींच्या योजनेची माहिती लपवली; आमदार कैलास पाटील यांनी कृषी विभागाचे काढले वाभाडे

Next Post

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group