• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 9, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 27, 2026
in राजकारण
0
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ
0
SHARES
268
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज (दि.२७) धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध शासकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ कार्यक्रमासह विविध विभागांच्या आढावा बैठका, वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आणि स्थानिक भेटी असा त्यांचा दिवसभराचा व्यस्त दौरा राहणार आहे. या दौऱ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे जिल्हा परिषदेतर्फे सादर करण्यात येणारे ‘व्हिजन २०३०’. या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ७०० गावांच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. या आराखड्यात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालविकास, ग्रामविकास आणि शाश्वत विकास या महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ होणार असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय आणि आगामी योजनांबाबत मंत्री गोरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात धाराशिव जिल्ह्यासाठी विशेष घोषणा होणार का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
दौऱ्यानुसार सकाळी १०.१५ वाजता तामलवाडी येथे आगमन करून ते शासकीय सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर १०.५० वाजता अपसिंगा येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात सहभागी होतील.
यानंतर ११.३० वाजता धाराशिव येथे जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १२.२० वाजता शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहून, दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.
त्यानंतर दुपारी २.१० वाजता महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते सिद्धेश्वर वडगाव येथे भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधतील.
दौरा पूर्ण करून मंत्री जयकुमार गोरे सायंकाळी सोलापूरकडे रवाना होणार असून तेथून रात्री रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि संबंधित विभागांनी सर्व तयारी पूर्ण केली असून, विशेषतः ‘व्हिजन २०३०’ कार्यक्रम आणि विभागीय आढावा बैठकींमधून धाराशिवच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘आपला जीव धाराशिव’ या विशेष गीताचे प्रदर्शन होणार आहे.

SendShareTweet
Previous Post

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

Next Post

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

Related Posts

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

July 31, 2026
Next Post
पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १७ जण गंभीर जखमी

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १७ जण गंभीर जखमी

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group