• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 19, 2026
in Drought
0
शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले
0
SHARES
94
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

गेल्या वर्षी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना यंदा पावसातील प्रदीर्घ खंडाने पुन्हा संकटात ढकलले आहे. सोयाबीनसह खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत उभी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बैठका, पंचनामे आणि अहवालांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवून न ठेवता शासनाने आता थेट मदतीचा निर्णय घ्यावा. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.
नांदेड येथील जिल्हा नियोजन सभागृहात राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१९) छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील दुष्काळ व पीक परिस्थितीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस आमदार कैलास पाटील उपस्थित होते. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत बळीराजाला तातडीने दिलासा देण्याची मागणी केली. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आणि मोठ्या आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

या संकटातून सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम पुन्हा संकटात सापडला आहे. एका वर्षी अतिवृष्टीने उद्ध्वस्त करायचे आणि दुसऱ्या वर्षी पावसाच्या खंडाने पिके करपवायची, अशा दुहेरी संकटात शेतकरी अक्षरशः भरडला जात असल्याचे आमदार पाटील यांनी बैठकीत सांगितले.
पावसातील प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीनसह अन्य खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या पिकांची वाताहत होत आहे. त्यामुळे आता केवळ पीक वाचविण्याचेच संकट नाही, तर पशुधनासाठी चारा, पिण्याचे पाणी आणि पुढील हंगामासाठी आवश्यक आर्थिक व्यवस्था अशा अनेक प्रश्नांनी शेतकऱ्यांना घेरले आहे.

कागदावरची परिस्थिती आणि प्रत्यक्ष शेताच्या बांधावरचे वास्तव यामध्ये फरक असू शकतो. त्यामुळे पंचनाम्यांच्या किचकट प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवून न ठेवता शासनाने प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. केवळ बैठका, पंचनामे, अहवाल आणि कागदावरील आकडे पुरेसे नसून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची गरज असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

पीक विम्याच्या संदर्भातील आवश्यक निकष तातडीने लागू करावेत. केवळ कागदोपत्री निकषांमुळे शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवू नये. प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगांच्या आधारे नुकसान निश्चित करून त्यानुसार पीक विम्याची नुकसानभरपाई ठरवावी आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

पावसातील खंडामुळे पिकांसोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या भागांत पशुधनासाठी चाऱ्याची तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करावी. दुष्काळी भागांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

बळीराजा संकटात असताना त्याला धीर देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदत देण्यासाठी शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले.

SendShareTweet
Previous Post

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

Next Post

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Related Posts

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026
Next Post
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

ताज्या घडामोडी

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 19, 2026
शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

September 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group