• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 10, 2026
in क्राईम
0
दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न
0
SHARES
404
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचताच पोलिसांवर दगडफेक करून घटनास्थळावरून पसार झालेल्या टोळीचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारातून दोन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एकूण १० आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. या कारवाईमुळे दरोड्याच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पोलिस पथकाच्या दिशेने दगडफेक केली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१०(४), ३१०(५), १२१, ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असता आरोपींकडे दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
दरम्यान, दि. ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. सुदर्शन कासार व त्यांचे पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. या कारवाईत रामा उर्फ बेल्या शंकर काळे (वय २३) आणि सरदार शंकर काळे (वय २८), दोघे रा. कन्हेरवाडी, ता. कळंब यांना कन्हेरवाडी शिवारातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांसोबत मिळून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. त्यानंतरच्या तपासात या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एकूण १० आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक अहवालासह त्यांना वाशी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरोड्याच्या तयारीतील टोळीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विविध पातळ्यांवर तपास सुरू केला होता. पेट्रोलिंगदरम्यान मिळालेली गोपनीय माहिती आणि त्याआधारे केलेली अचूक कारवाई पोलिसांसाठी महत्त्वाची ठरली. पोलिसांवर दगडफेक करून पसार झालेल्या आरोपींपर्यंत अखेर स्थानिक गुन्हे शाखा पोहोचली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि. सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, पोह. प्रकाश औताडे, पोह. जावेद काझी, पोह. फरहान पठाण, चापोह. नागनाथ गुरव आणि चापोह. रत्नदीप डोंगरे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

SendShareTweet
Previous Post

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

Next Post

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

Related Posts

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

August 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कळंबमध्ये एमडी ड्रग्जसह दोन तरुण जेरबंद; २९ पुड्यातील ११.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा; गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

July 31, 2026
Next Post
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी 'नासा'ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group