• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 22, 2026
in Drought
0
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट
0
SHARES
401
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात यंदा पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून, पावसाअभावी सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके संकटात आली आहेत.

चारा व पाणीटंचाईची परिस्थितीही गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा शेतकरी आणि जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिकांची अवस्था बिकट झाली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसह विविध खरीप पिकांवर अवर्षणाचा मोठा परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात पावसाची तूट ५० टक्क्यांवर गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर यंदा अवर्षणाच्या संकटाने शेतकरी अक्षरशः पिचून निघाला आहे. खरीप हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात धाराशिव, वाशी, कळंब आणि तुळजापूर तालुक्यांतील काही गावांना भेट देऊन तेथील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. पिकांची झालेली हानी, पाणीटंचाई, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि शासनाकडून अपेक्षित मदत याबाबत शेतकरी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडणार आहेत.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर पीकविमा, दुष्काळी अनुदान, चारा डेपो, टँकरने पाणीपुरवठा आणि रोजगार हमीच्या कामांना गती देण्याची मागणीही होत आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यात शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे धाराशिवसह लातूर जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कोणते निर्णय घेते, याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या दौऱ्यातील पाहणी आणि शेतकऱ्यांशी होणारा संवाद याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

SendShareTweet
Previous Post

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

Next Post

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

Related Posts

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026
शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

September 19, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस   मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत द्या; प्रशासनाची राज्य सरकारकडे शिफारस मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

September 15, 2026
Next Post
मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

ताज्या घडामोडी

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

September 22, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group