• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 21, 2026
in Arambh Marathi Special, Breaking
0
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. यासंदर्भात उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज गोवर्धनवाडी या त्यांच्या मूळ गावी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ओमराजे निंबाळकर यांनी हजारो कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांचे मत जाणून घेताना जिल्ह्याच्या भविष्यातील राजकीय दिशा, विकासकामे आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावरही चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा सल्ला दिल्याचे समजते.

हा निर्णय केवळ आजच्या बैठकीत झालेला नसून काही दिवसांपूर्वीच ओमराजे यांनी मनोमन निश्चित केला होता. त्याआधी त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा केली आहे.
शिंदे सेनेत प्रवेश करण्यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी दोन महत्त्वाच्या अटी ठेवल्याचे समजते.

पहिली अट म्हणजे महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा प्रचार कधीच करणार नाही. तसेच भविष्यातही राणा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय भूमिकेला विरोध कायम ठेवण्याची मुभा असावी, अशी भूमिका ओमराजे यांनी स्पष्ट केली होती.

दुसरी अट म्हणजे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारीची हमी.

आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी ओमराजे यांनी केली असून त्याबाबत एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत.
राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता असल्यामुळे विकासकामांना गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणे फायदेशीर ठरेल, असा विचार ओमराजे समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी भरीव विकास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.

याशिवाय राज्याचे मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या समन्वयाने धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारीही ओमराजे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते.
आज झालेल्या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी सत्तास्थानी असलेल्या पक्षात प्रवेश करून विकासकामांना चालना द्यावी, अशी एकमुखी भूमिका मांडली.

केंद्र आणि राज्यातील सत्तेशी थेट समन्वय साधल्यास मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

आता सर्वांचे लक्ष त्यांच्या अधिकृत भूमिकेकडे लागले असून उद्या ते पत्रकार परिषद किंवा कार्यकर्ता मेळाव्यातून आपल्या निर्णयाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. ओमराजे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार आहेत. विशेषतः ओमराजे आणि अंधार राणा पाटील यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा उफाळून येणार आहे.

SendShareTweet
Previous Post

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

Related Posts

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

June 21, 2026
न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

Breaking पीकविमा रोखण्यासाठी विमा कंपनीचा नवा डाव; ३३६ कोटींच्या दाव्यावर केंद्रीय समितीकडे अपील

May 19, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

ताज्या घडामोडी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026
ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

June 21, 2026
न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group