• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 22, 2026
in आरंभ मराठी विशेष
0
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


आरंभ मराठी / धाराशिव

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.  बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांचा तब्बल 721 मतांनी पराभव केला आहे.

अधिकृत निकालाची घोषणा काही वेळात होणार असली तरी मतमोजणी केंद्राबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. मतमोजणीत बसवराज पाटील यांना 845 मते मिळाली, तर महेश देशमुख यांना केवळ 124 मतांवर समाधान मानावे लागले. याशिवाय 14 मते बाद ठरली. या मतदारसंघात एकूण 988 मतदार असून त्यापैकी 983 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.


निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी सातत्याने संपर्क साधत प्रचाराची आघाडी कायम ठेवली. त्याचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला.

उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे सहाशेहून अधिक मते निश्चित मानली जात होती, तर महाविकास आघाडीकडे सुमारे अडीचशे मतांचे संख्याबळ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्ष निकालात बसवराज पाटील यांना अपेक्षेपेक्षा खूपच जास्त मते मिळाल्याने महायुतीने महाविकास आघाडीतील काही मतदारांची मते आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीची तब्बल 80 मते फुटल्याचा अंदाज आहे.

महेश देशमुख यांना काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांचीही संपूर्ण साथ मिळालेली नसल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद आणि मतांची विभागणी हा या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना सक्रिय सहभाग घेतला होता.

मात्र त्यानंतर त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना वेग आला. त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेचा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील निर्माण झालेल्या संभ्रमाचा मतदानावर परिणाम झाला. शिवसेना (उबाठा) पक्षाशी संबंधित काही मतदारांनीही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे मतांच्या आकडेवारीवरून सूचित होत आहे. या निकालामुळे महायुतीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वर्चस्व आणखी मजबूत झाले आहे.

अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच मतमोजणी केंद्राबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत जल्लोष सुरू केला आहे. थोड्याच वेळात विजयी उमेदवार बसवराज पाटील यांची भव्य विजय मिरवणूक काढण्यात येणार आहे.

SendShareTweet
Previous Post

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Related Posts

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

ताज्या घडामोडी

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group