• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, September 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 21, 2026
in Breaking
0
ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?
0
SHARES
686
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल शनिवारी जाहीर झाल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान,त्यांच्या मनधरणीसाठी ठाकरे गटाचे नेते त्यांच्या पुण्यातील घरी पोहोचले होते तर शिवसेना गटाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन चर्चा केली. काही वेळापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातून धाराशिवच्या दिशेने निघाले असून, आज दुपारी त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

निकालापूर्वीच ओमराजे यांनी निकालानंतर आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले होते. मात्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही त्यांनी आपला अंतिम निर्णय जाहीर न केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात चर्चेत असलेले शिवसेनेतील कथित ‘ऑपरेशन टायगर’ सध्या तरी अडचणीत आल्याचे मानले जात आहे. विशेषतः काही खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमध्ये ओमराजे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असल्याने त्यांच्या निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, ओमराजे यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर न केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षालाही त्यांच्याबाबत आशा कायम असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार आणि ओमराजे यांचे मित्र कैलास पाटील आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी शनिवारी रात्री उशिरा ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांनी ही भेट झाल्याचे मान्य केले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप त्यांनी ओमराजे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात दूरध्वनीवरूनही चर्चा झाल्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

भेटीदरम्यान ओमराजे यांनी अंतिम निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत मागितल्याचे समजते. या कालावधीत ते कार्यकर्ते, समर्थक आणि निकटवर्तीयांशी चर्चा करून आपली भूमिका निश्चित करणार असल्याची माहिती मिळत आहे.
ओमराजे निंबाळकर हे आज धाराशिवमध्ये दाखल होणार असून ते प्रथम आपल्या कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवसांत आपली राजकीय दिशा स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे येणारे दोन दिवस धाराशिवसह राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ओमराजे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच राहण्याचा निर्णय घेतल्यास संभाव्य पक्षांतराच्या हालचालींना मोठा धक्का बसू शकतो. तसेच इतर काही खासदारांच्या भूमिकेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ओमराजे यांनी उबाठा गटातच राहण्याचा निर्णय घेतल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत इतर संभाव्य पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात कठोर भूमिका घेऊ शकतात. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर निर्माण झालेल्या या नव्या राजकीय समीकरणांमध्ये आता ओमराजे निंबाळकर यांच्या एका निर्णयावर अनेक घडामोडी अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar
SendShareTweet
Previous Post

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

Next Post

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

Related Posts

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
Next Post
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ताज्या घडामोडी

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 19, 2026
शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

September 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group