• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, June 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 8, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
911
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी/ धाराशिव

भूसंपादन प्रकरणात नुकतीच अटक झालेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा धाराशिवचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. अधिकार क्षेत्रात नसताना आदेश पारित केल्याप्रकरणी न्यायालयाने पाठक यांना तब्बल ५० हजार रुपयांचा वैयक्तिक दंड ठोठावला असून, ही रक्कम स्वतःच्या खिशातून भरण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शासनाकडून ही रक्कम भरली जाणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

खटल्याची माहिती अशी की, कोठाळवाडी (ता. कळंब जि. धाराशिव) येथील शेती जमीन आणि त्यावरील वहिवाटीच्या वादातून हे प्रकरण उभे राहिले होते. संबंधित जमिनीवरून दोन गटांत तणाव निर्माण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, कळंब यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४५ अंतर्गत कारवाई करत वादग्रस्त जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश पारित करण्यात आला होता.
या आदेशाविरोधात प्रतिवादी माणिक गोवर्धन कोठावळे यांनी धाराशिवचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २५७ अंतर्गत पुनरिक्षण अर्ज दाखल केला. त्यानंतर अविनाश पाठक यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला. मात्र, फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत दिलेल्या आदेशावर महसूल कायद्याअंतर्गत पुनरिक्षण करण्याचा अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांना नसल्याचा मुद्दा पुढे आला.
याच पार्श्वभूमीवर द्वारकाबाई सुधाकर कोठावळे यांनी ॲड. विक्रम उंदरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर असा मुद्दा मांडण्यात आला की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४५ अंतर्गत दिलेल्या आदेशाविरोधात अपील किंवा आव्हान देण्याची तरतूद सत्र न्यायालयात आहे. त्यामुळे महसूल अधिकाराचा वापर करून अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश रद्द करणे हे कायद्याच्या चौकटीबाहेरचे पाऊल होते.
हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती एस. एस. ठोंबरे यांनी अविनाश पाठक यांनी अधिकार नसताना आदेश पारित केल्याचे स्पष्ट नमूद केले. न्यायालयाने संबंधित आदेश बेकायदेशीर ठरवत तो रद्द केला आणि अधिकाराचा अतिरेक केल्याबद्दल पाठक यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दरम्यान, बीडमधील राष्ट्रीय महामार्ग भरपाई आणि मावेजा वाटपातील कथित घोटाळा प्रकरणात अविनाश पाठक यांना नुकतीच अटक करण्यात आलेली असताना, आता उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, एकीकडे भूसंपादन प्रकरणात नुकतीच अटक झाली असताना अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन दिलेल्या आदेशाची किंमत म्हणून आता पाठक यांना ५० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दंडाची ही रक्कम चार आठवड्यात छत्रपती संभाजी नगरच्या कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी जमा करण्यात यावी,असे न्यायालयाने आदेशित केले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#fine#HighCourt#Dharashiv#case#authority
SendShareTweet
Previous Post

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्य नियुक्ती प्रक्रियेसाठी तीन महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Next Post

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group