• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, October 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 15, 2026
in अध्यात्म
0
0
SHARES
663
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


मंदिर संस्थानकडून कारवाई,भाविकांतून स्वागत

आरंभ मराठी / धाराशिव


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्या २४ जणांवर एकाच दिवसात धडक कारवाई करण्यात आली असून, कोटपा कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.विशेष मंदिर संस्थानच्याच प्रशासकीय कार्यालयामध्ये दोघांना धुम्रपान करताना पकडण्यात आले आहे.या कारवाईने मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या आणि मंदिराचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तसेच या कारवाईचे भाविकातून स्वागत करण्यात येत आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मंगळवारी  कोटपा (COTPA) कायद्याअंतर्गत विशेष धाड सत्र राबविण्यात आले. कोटपा (Cigarettes and Other Tobacco Products Act, 2003) हा तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला कायदा असून, तो १ मे २००४ पासून अंमलात आहे. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, अल्पवयीन मुलांना तंबाखू विक्रीवर मनाई तसेच शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

या मोहिमेदरम्यान कोटपा कायद्याच्या कलम ४, कलम ६ (A) व कलम ६ (B) अन्वये एकूण २४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मंदिर परिसरातील २२ व मंदिर प्रशासकीय इमारतीतील २ अशा एकूण २४ व्यक्तींचा समावेश असून, त्यांच्याकडून एकूण ४,६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईत डॉ. विक्रांत राठोड (जिल्हा सल्लागार, NTCP), श्री प्रदीप तटाळे (एनसीडी समुपदेशक, जिल्हा रुग्णालय धाराशिव), श्रीमती भाग्यश्री हिरेमठ (एनसीडी समुपदेशक, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर) तसेच श्री कृष्णा सावंत (नर्सिंग ऑफिसर, जिल्हा रुग्णालय धाराशिव) यांनी सहभाग घेतला. याशिवाय मंदिर संस्थानचे स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे, सहायक स्वच्छता निरीक्षक सुमित रघुजीवार आणि सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात येते की, मंदिर व मंदिर परिसर हे पवित्र तसेच सार्वजनिक स्थळ असल्याने येथे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. परिसरात कोणी थुंकताना आढळल्यास संबंधित व्यक्तीचा फोटो काढून ९०९६८५२७२५ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावा. प्राप्त तक्रारींवर मंदिर संस्थानच्या वतीने तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याबाबत सूचना देणारे फलक जागोजागी लावण्यात आले असून, त्या फलकावरील नमूद केलेल्या ९०९६८५२७२५ या व्हॉट्सअँप क्रमांकावर आपली स्वच्छतेसंदर्भातील तक्रार नोंदवावी तसेच भाविकांनी नियमांचे पालन करून स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

SendShareTweet
Previous Post

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

Next Post

जिजाऊ चौक पोलिस चौकी बनली ‘शोभेची बाहुली’; नियुक्त केलेल्या चारही कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा नाही

Related Posts

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

July 25, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026
श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

July 12, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026
Next Post

जिजाऊ चौक पोलिस चौकी बनली ‘शोभेची बाहुली’; नियुक्त केलेल्या चारही कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा नाही

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात 'या' आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group