• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, June 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धक्कादायक वास्तव; ४ लाख शिक्षक व भावी शिक्षक नापास !

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 8, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
482
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’चा (शिक्षक पात्रता परीक्षा) निकाल जाहीर केला. त्यात चार लाख ४६ हजार ७३० पैकी अवघे ११.२८ टक्केच (५० हजार ३६९) भावी शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत तब्बल तीन लाख ९६ हजार ३२५ परीक्षार्थी म्हणजे जवळपास ४ लाख सध्याचे शिक्षक आणि भावी शिक्षक नापास झाले आहेत.

राजकीय चर्चांमध्ये या महत्त्वाच्या बातमीकडे दुर्लक्ष झाले आहे. या परीक्षेला सध्या नोकरीत असलेले अनेक शिक्षक आणि ज्यांना शिक्षक व्हायचे आहे, असेही शिक्षक परीक्षेला बसले होते.. यातून सध्याच्या व्यवस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिकून डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा काय आहे हे यानिमित्ताने समोर आले आहे.

दर्जाहीन शिक्षणातून दर्जाहीन विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यातून पुन्हा उद्याचे दर्जा खालावलेले शिक्षक आणि त्यांच्या हातून दिले जाणारे पुन्हा तसे शिक्षण हे दृष्टचक्र या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे..
मान्य आहे की नोकरीत असणाऱ्या शिक्षकांना या परीक्षेची सक्ती करावी का ? यावर वाद होऊ शकतो. ती शक्ती कोणत्या तारखेपासून करावी ? यावरही वाद होऊ शकतो. त्याचप्रमाणे नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असावा का ? यावरही नक्कीच चर्चा होऊ शकते. त्या मुद्द्यांवर मी शिक्षकांच्या सोबत आहे किंबहुना राज्यातील शिक्षकच काय सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी ज्ञान अद्ययावत होणारी परीक्षा असली पाहिजे व त्या परीक्षेच्या आधारे चे वेतनवाढ दिली पाहिजे. यामुळे शिक्षकांसह घटक वाचन करतील.अभ्यास करतील पण तो विषय वेगळा आहे..

परीक्षेला बसलेले नोकरीतील शिक्षक आणि भावी शिक्षकांची ही दयनीय अवस्था हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे दिसणारे रूप यावर आपण चर्चा करणार आहोत की नाही..? नोकरी लागल्यानंतर शिक्षकांना त्यांनी स्वतःला update ठेवावे वाचन करावे ही अपेक्षा आहे.. वर्षाभरात १४५ दिवस सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांमध्ये तर कोणतेही अशैक्षणिक काम नसते ना ? या सुट्ट्यांमध्ये स्वतःला अद्ययावत करणे वाचन करणे नक्कीच शक्य आहे.. मी शिक्षक म्हणून काम केले,आज माझ्या घरी विकत घेतलेली ९०० पुस्तके आहेत व रिकाम्या वेळेत मी फक्त आणि फक्त वाचनच केले..

पण तरीही आज शिक्षक समुदाय अशैक्षणिक काम ही ढाल करून स्वतः समृद्ध होण्याचे नाकारत आहे., आमची नोकरी ही तुम्ही स्वतःला किती समृद्ध केले हे मागत नाही त्या आधारे शिक्षकांना वेतन वाढ दिली जात नाही त्या आधारे शिक्षकांचे मूल्यमापन होत नाही..
पुस्तके लिहिणारा शिक्षक आणि वर्तमानपत्र न वाचता नोकरी करणारा शिक्षक दोघांनाही सारखीच वेतन वाढ दिली जाते.

नोकरीतील सुरक्षितता ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला काहीच केले नाही तरी चालेल असा संदेश देते आणि कधीतरी शिकलेल्या पुस्तकांच्या आधारे लहान मुलांना शिकवायला काय लागते ? अशी मानसिकता करून अनेक जण जगत असतात… या परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांचा दर्जा हा या अर्थाने सन्माननीय अपवाद वगळता प्रातिनिधिक आहे.. इथून पुढे दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर हेच सत्य अधोरेखित होताना आपल्याला दिसणार आहे..

अनेक जण असे म्हणतील की या परीक्षेला राज्यातील कमी शिक्षक बसले व भावी शिक्षकांची संख्या मोठी होती पण ते भावी शिक्षक सुद्धा याच शिक्षण व्यवस्थेचे अपत्ये आहेत म्हणजे ते नापास होणारे विद्यार्थी सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवतात. हे यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.. त्यामुळे नोकरीतले शिक्षक की विद्यार्थी शिक्षक हा वादविवाद करण्यापेक्षा आमची शिक्षण व्यवस्था नापास होते आहे याबद्दल चर्चा व्हायला हवी

नोकरीतले शिक्षक स्वतःला समृद्ध करत नाहीत. पुस्तक वाचत नाही. याबाबत काय करता येईल ?याची चर्चा करायला हवी. तेव्हा TET सक्ती असावी की नसावी याचा कीस जरूर काढूया…त्याबाबत आंदोलने करूया.. पण परीक्षा असेल किंवा नसेल आपण स्वतःला समृद्ध करणार आहोत की नाही ? आम्ही वाचन करणार आहोत की नाही ?आम्ही सुट्टीचा सदुपयोग स्वतःच्या समृद्धीसाठी करणार आहोत की नाही ? हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे ..

ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक ग.प्र.प्रधान यांची एकदा मुलाखत घेतली होती. ते म्हणाले नोकरीला लागल्यावर सुट्टी लागण्यापूर्वी त्यांचे जेष्ठ शिक्षक यांनी त्यांना ४० इंग्रजी पुस्तकांची यादी दिली व शाळा कॉलेज उघडल्यानंतर पुस्तकांमध्ये काय वाचले याच्या नोट्स मागितल्या.. मी प्रधान सराना म्हणालो की आजचे शिक्षक म्हणतात बाकीचा समाज इतका बिघडला आहे, तुम्ही शिक्षकांच्याच मागे कधी लागणार ? तेव्हा संतापलेले प्रधान सर मला अजूनही आठवतात .ते म्हणाले किती दिवस तुम्ही समाजाच्या मागे लपणार आहात..? अंत:प्रेरणा नावाची काही गोष्ट तुमच्याकडे आहे की नाही ?

अंतर्मुख होऊ या…

हेरंब कुलकर्णी

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#shocking#reality#teachers#future#fail#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

Next Post

मतमोजणीची उत्कंठा शिगेला; दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

मतमोजणीची उत्कंठा शिगेला; दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार

ढोकी गणात अवघ्या एका मताने इतिहास घडला!; ढोकीतील तिन्ही जागांवर शिवसेना (उबाठा) चा थरारक विजय

ताज्या घडामोडी

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group