• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुधात भेसळ; धाराशिव जिल्ह्यात 16 दूध संकलन आणि प्रक्रिया उद्योगांवर अन्न व औषध प्रशासनाकडून छापे, तपासणीसाठी नमुने पाठवले, अहवालानंतर कारवाया

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 22, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दुधामध्ये भेसळ होत असल्याच्या संशयावरून जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने दूध डेअरी तसेच संकलन केंद्र आणि दूध प्रक्रिया उद्योगांवर छापे टाकले असून,दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, दुधात भेसळीचे प्रमाण वाढल्याने व ग्राहकांना स्वच्छ, ताजे, निर्भेळ, दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे यासाठी जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीला भेसळीबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी (समिती सचिव), वजन मापे विभाग यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध दुध डेअरी/दुध संकलन केंद्राच्या तपासण्या करून नमुने घेण्याची मोहीम राबविली. हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधिताविरुद्ध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित पेढीना तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रूटीची पूर्तता व सुधारणा करण्यास नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी केल्या कारवाया

भूम तालुक्यातील मे. हाके ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, धाराशिव तालुक्यातील शेकापूर येथील मे.प्रियदर्शनी मिल्क कलेक्शन ॲण्ड प्रोडक्ट, कळंब तालुक्यातील मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, धाराशिव शहरातील एम.आय.डी.सी. येथील क्रिमलाईन डेअरी प्रोडक्टस्‍ लिमिटेड, तसेच धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथील मे.दत्तसाई मल्टीस्टेट को-ऑप मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस लिमिटेड तसेच धाराशिव बार्शी नाका जिजाऊ चौक येथील दत्तअमृत दुध डेअरी, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील गवळण मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस, कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुमित खवा सेंटर व स्वामी समर्थ सेंटर, धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) औसा रोड येथील साधना प्रदीप गुंड पाडोळीकर मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस व विश्वरुपा फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, परंडा तालुक्यातील वाकडी येथील श्री दत्त दुध संकलन व चिलींग सेटर, हिंगनगांव (बु) येथील विनायक दुध संकलन व शितकरण केंद्र व गौरी दुध संकलन केंद्र, भूम तालुक्यातील पाथरुड येथील मयुरी खवा व पेढा उत्पादन व विक्री केंद्र, कल्लेश्वर खवा व पेढा उत्पादक विक्री केंद्र, सिध्दनाथ खवा व पेढा उत्पादक विक्री केंद्र आदी केंद्रावर भेटी देऊन नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी श्री.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त शि.बा.कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी न.त.मुजावर व इतर कर्मचारी यांनी केली आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास कार्यालयास व टोल फ्री क्रमांक. १८००२२२३६५ यावर तक्रार नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाने नागरिकांना केले आहे.

SendShareTweet
Previous Post

दिव्यांगाच्या दारी मेळाव्याला मोठा प्रतिसाद; आमदार बच्चू कडू म्हणाले, प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक लाभ देण्याची आमची जबाबदारी

Next Post

पाण्याअभावी कोरड्या झालेल्या तलावातील जागेवर आता शेतकऱ्यांना चारा पिके घेता येणार; टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय,लवकरच होणार जमिनीचे वाटप

Related Posts

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
Next Post

पाण्याअभावी कोरड्या झालेल्या तलावातील जागेवर आता शेतकऱ्यांना चारा पिके घेता येणार; टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय,लवकरच होणार जमिनीचे वाटप

श्री. सिद्धिविनायक ऍग्रीटेक इंडस्ट्रीजचे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

September 18, 2026
बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

September 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group