• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, August 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 15, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
574
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.15) दुपारी चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्रे ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला होता; मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख 18 हजार 17 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जालना आणि इचलकरंजी या दोन ठिकाणी पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होत असून, त्यामुळे त्या शहरांतील नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकांमधून एकूण 2869 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये 1442 जागा महिलांसाठी राखीव असून, अनुसूचित जातींसाठी 341, अनुसूचित जमातींसाठी 77 आणि ओबीसी प्रवर्गासाठी 759 जागांचा समावेश आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा महानगरपालिकेच्या वर्गवारीनुसार निश्चित करण्यात आली आहे.

अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख रुपये, ब वर्गासाठी 13 लाख रुपये, क वर्गासाठी 11 लाख रुपये तर ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख रुपये इतकी खर्चमर्यादा राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी खर्चावर काटेकोर नजर ठेवण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले. महानगरपालिका निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता सोमवार दिनांक 15 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे.

या कालावधीत कोणत्याही प्रकारची आचारसंहिता भंग करणारी कृती आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय तयारी करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर 2025 अशी आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी 2026 आहे.

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले असून, लोकशाहीची ही प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#election#program#municipal#state#announced#voting#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

2021 च्या पीक विमा रकमेवर पाणी; 374 कोटी रुपयांच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकडे दुर्लक्ष

Next Post

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

तुळजापूरमध्ये निकालाआधीच राजकीय तणाव, दोन गटांत जोरदार राडा

मुरुम येथे SBI बँकेत RBI नियमांची पायमल्ली?

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group