• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्ह्याला चार दिवसांचा पावसाचा यलो अलर्ट; रब्बी पेरण्यांना विलंब, फळबागांना फटका

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 25, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
370
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी/धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात जोरदार ते अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरातील तापमान वाढल्यामुळे वातावरणात बदल निर्माण झाला आहे.

त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या मध्य व मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. या प्रणालीचा प्रभाव विशेषतः धाराशिव, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यांवर पडत असून, काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या ऊस, तूर आणि सोयाबीन ही प्रमुख खरीप पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. या पावसामुळे ऊस आणि तूर पिकांना काही प्रमाणात ओलावा मिळून फायदा होईल, मात्र ज्या भागांत काढणी सुरू आहे तिथे पिकांची गुणवत्ता घटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्या उशिरा होतील, असा अंदाज आहे. धाराशिव परिसरातील केशर आंबा, द्राक्षबागा, डाळिंब आणि पपईच्या बागा सध्या वाढीच्या टप्प्यात आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचा अभाव निर्माण झाला असून, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

परिणामी, फळांची गळ, फुगवट्याचे रोग आणि उत्पादनात घट होण्याचा धोका वाढला आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने यंदा तब्बल सहा महिने अखंड पाऊस पडत आहे. पारंपरिक शेतीचं चक्र पूर्णपणे विस्कळीत झालं असून, अनेक शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

सध्या यलो अलर्ट असला तरी पुढील काही दिवसांत परिस्थिती गंभीर झाल्यास धाराशिव जिल्ह्याला रेड अलर्ट जारी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्या शेतकरी रब्बी हंगामासाठी जमिनीची मशागत करण्यात व्यस्त आहेत. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#yellow#alert#days#rain#district#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार

Next Post

भूममध्ये व्यवसायाच्या नावाखाली 13 लाख 15 हजारांची फसवणूक

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

भूममध्ये व्यवसायाच्या नावाखाली 13 लाख 15 हजारांची फसवणूक

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

ताज्या घडामोडी

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group