• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 20, 2026
in Breaking, Exclusive
0
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष
0
SHARES
1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या बहुचर्चित खटल्यात न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद करत संशयाचा फायदा आरोपींना दिला.

न्यायालयाने आपल्या निकालात तपास प्रक्रियेतील त्रुटी आणि माफीच्या साक्षीदाराने वेळोवेळी बदललेले जबाब यांचा उल्लेख केला. तसेच सीबीआयने नोंदविलेल्या काही जबाबांवरही न्यायालयाने ताशेरे ओढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी मुंबई येथे हत्या झाली होती. या प्रकरणात माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासादरम्यान या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले होते.

2009 मध्ये तत्कालीन खासदार असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणात तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, दीर्घकालीन सुनावणीनंतर अखेर न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. निकाल जाहीर होताच धाराशिव शहरात डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू केला.

फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी “सत्याचा विजय झाला” अशी भावना व्यक्त केली. निकालानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आज सत्याचा विजय झाला आहे. मागील वीस वर्षांपासून आमच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात राजकीय आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणाचा परिणाम लहान मुलांच्या मानसिकतेवरही झाला. राजकीय जीवनात सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागला. अखेर न्यायालयाने सत्याला न्याय दिला आहे.”

या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल त्यांच्या भूमिकेच्या विरोधात लागल्याचे मानले जात असताना, दुसरीकडे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनीही राजकीय वातावरण तापले आहे. निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटात जाण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले.

तर अनिल देसाई यांनी ओमराजे यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सांगितले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल हा केवळ न्यायालयीन निर्णय नसून धाराशिवच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वीस वर्षांहून अधिक काळ चर्चेत राहिलेल्या या प्रकरणाच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

SendShareTweet
Previous Post

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

Next Post

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

Related Posts

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
Next Post
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

'निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..' निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण..... निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

ताज्या घडामोडी

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

September 18, 2026
बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

September 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group