• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा; कळंब शहरातील शेकडो कुटुंबांना दिलासा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 21, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
148
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / कळंब

राज्य शासनाने २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी नगर परिषद कळंबकडून सुरू करण्यात आली असून, त्यामुळे शहरातील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आता अधिकृत मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून नगर परिषदचे स्वागत करण्यात येत आहे. कळंब शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील परिसर, सरकारी दवाखान्यामागील भाग, कल्पना नगर पारधी वस्ती, जुने पोलीस स्टेशन समोरील परिसर, कळंब कन्या शाळेसमोरील भाग तसेच इतर अनेक वस्त्यांमधील रहिवाशांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. अनेक वर्षांपासून नागरिक अतिक्रमणाच्या भीतीत राहत होते.

मात्र शासनाच्या नव्या धोरणामुळे त्यांना आता कायदेशीर संरक्षण आणि मालकी हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषद कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे.

नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. शहरातील विविध भागांना भेटी देऊन त्यांनी अतिक्रमणधारक नागरिकांशी संवाद साधला आणि नियमितीकरण प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी शासन निर्णयांचा सखोल अभ्यास करून नियमितीकरणासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे कामे वेगाने सुरू आहेत. नगर परिषद कर्मचारी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असून अर्ज प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करत आहेत.
यासंदर्भात बोलताना नगराध्यक्ष यांनी सांगितले की, हा निर्णय नगर परिषद कळंबच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सर्वसामान्य कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. नगर परिषद प्रशासनाने पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. शासन नियमांनुसार पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरणाचा लाभ दिला जाणार असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

नगराध्यक्षा अतिक्रमणधारकांच्या दारी

नगराध्यक्षा सौ. सुनंदा कापसे यांनी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन अतिक्रमणधारक नागरिकांच्या भेटी घेतल्या. नियमितीकरण प्रक्रियेची माहिती देत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. या निर्णयामुळे भविष्यात स्थैर्य मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शन करून सहकार्य केले.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#regularization#Relief#families#Kalamb#city
SendShareTweet
Previous Post

मनोज जरांगे-पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांसाठी दिले ‘हे’ आदेश

Next Post

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Related Posts

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

May 21, 2026

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

May 21, 2026

मनोज जरांगे-पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांसाठी दिले ‘हे’ आदेश

May 21, 2026

मार्चमधील अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

May 19, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६२ लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

May 18, 2026

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

May 18, 2026
Next Post

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

ताज्या घडामोडी

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

May 21, 2026

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

May 21, 2026

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा; कळंब शहरातील शेकडो कुटुंबांना दिलासा

May 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group