• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, June 3, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे दोन बालविवाह रोखले; प्रशासनाची तात्काळ कारवाई

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 19, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
327
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बालविवाहावर लक्ष देऊन तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार यंत्रणेने अलर्ट मोडवर राहत कारवाई केली.

धाराशिव तालुक्यातील कुमाळवाडी व मुक्काम पोस्ट वानेवाडी येथे दोन बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला मिळताच प्रशासनाने तात्काळ पावले उचलून हे दोन्ही बालविवाह यशस्वीरित्या रोखले.

मिळालेल्या माहितीनुसार, या बालविवाहाची खात्री होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित गावांमध्ये पोहोचून पथकाने ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसह मुलींच्या घरी भेट दिली.

यावेळी मुलगी व मुलाकडील कुटुंबीयांना समुपदेशन करण्यात आले. तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्याची व शिक्षेची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशासनाच्या समुपदेशनामुळे दोन्ही ठिकाणी नियोजित बालविवाह तात्काळ थांबविण्यात आले.

या कारवाईदरम्यान दोन्ही गावांतील ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा बनसोडे, क्षेत्रीय कार्यकर्ते हर्षवर्धन मोहकर, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण, रविराज राऊत तसेच वन स्टॉप सेंटरचे सोहम पेठे व श्रीकांत साठे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

बालविवाह रोखल्यानंतर संबंधित मुला-मुलींच्या कुटुंबीयांना पुढील परिणामांविषयी समुपदेशन करण्यात आले. तसेच संबंधित मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती, धाराशिव येथे सादर करण्यात आले.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Prevented#marriages#action#administration
SendShareTweet
Previous Post

मानवतेला काळिमा फासणारी घटना, अवघ्या चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

Next Post

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधी गैरवापर केल्यामुळे शिराढोणच्या सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांचा निर्णय

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधी गैरवापर केल्यामुळे शिराढोणच्या सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांचा निर्णय

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group