• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, June 3, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 20, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
450
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने जिल्हाभरातील कृषि सेवा केंद्रांवर विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान विविध अनियमितता आढळून आल्याने एकूण १५ कृषि सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी एका केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, तर १४ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कृषि विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. ई-पॉस मशीनवरील नोंदीप्रमाणे खताचा साठा न जुळणे, परवान्यात नमूद नसलेल्या स्त्रोतांमधून बियाणे व खतांची खरेदी-विक्री करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, शेतकऱ्यांना नियमानुसार पावती न देणे, खरेदीची बिले उपलब्ध नसणे, तसेच अनुदानित खत विक्रीसंबंधित अभिलेख अपूर्ण ठेवणे अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्या.

तालुकानिहाय पाहता धाराशिव व तुळजापूर येथील प्रत्येकी १, उमरगा येथील ४, भूम येथील ३, परंडा येथील २, कळंब येथील २ आणि वाशी तालुक्यातील २ अशा एकूण १५ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कृषि विभागाने स्पष्ट केले आहे की, ही तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार असून दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर बियाणे, खते व कीटकनाशके संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जादा दराने विक्री, लिंकिंग, साठा रजिस्टर न ठेवणे, दरफलक न लावणे, अनधिकृत स्त्रोतांमधून खरेदी-विक्री, पावती न देणे किंवा परवान्यात नमूद नसलेल्या गोदामाचा वापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कृषि विभागाने शेतकऱ्यांना देखील महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक केंद्राची निवड करावी आणि प्रत्येक खरेदीवर पक्की पावती घ्यावी.

पावतीवर खरेदी केलेल्या वस्तूंचा तपशील व विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. अनुदानित खत घेताना ई-पॉस मशीनवरील बिल घेणे बंधनकारक असून खताच्या बॅगवरील किंमत आणि बिल यांची पडताळणी करावी. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्यावरील टॅग, पिशवी व थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करून अंतिम मुदत तपासावी आणि नामांकित कंपन्यांचीच उत्पादने खरेदी करावीत, असेही कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Action#Department#Agricultural#Servic#license
SendShareTweet
Previous Post

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधी गैरवापर केल्यामुळे शिराढोणच्या सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांचा निर्णय

Next Post

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली 'ही' मागणी

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group