• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, April 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; ८ गुन्हे उघड, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 17, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पवनचक्की परिसरात दरोडे व चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांसाठी
जबाबदार असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेगव्हाण शिवारात पवनचक्कीवर कार्यरत दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व रोख रक्कम लुटून आरोपी पसार झाले होते.

याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारच्या चोरीच्या घटना जिल्ह्यात इतर ठिकाणीही घडल्या होत्या. या गंभीर व अतिसंवेदनशील गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते.

त्यानुसार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ढोकी–कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून ५ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून २ महिंद्रा स्कॉर्पिओ, १ बोलेरो, तांब्याच्या तारा व रोख रक्कम असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी व वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी करताना सुरक्षारक्षकांना धमकावण्यासाठी मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनिल कालिदार शिंदे (रा. ढोकी), लखन बापू पवार (रा. उपळा), सिद्राम पोपट पवार (रा. वरूडा), उद्धव बापू शिंदे (रा. बावी) आणि विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी) अशी आहेत.

त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार तसेच बेंबळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#windmills#crimes#seized
SendShareTweet
Previous Post

धक्कादायक प्रकार.. गावावर ४ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या, चोरट्यांचा डोळा की भलतेच काही घडणार..? गावकरी भयभीत, घरफोड्यांनंतर ग्रामस्थांची झोप उडाली

Related Posts

धक्कादायक प्रकार.. गावावर ४ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या, चोरट्यांचा डोळा की भलतेच काही घडणार..? गावकरी भयभीत, घरफोड्यांनंतर ग्रामस्थांची झोप उडाली

April 16, 2026

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात ‘या’ आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

April 15, 2026

जिजाऊ चौक पोलिस चौकी बनली ‘शोभेची बाहुली’; नियुक्त केलेल्या चारही कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा नाही

April 15, 2026

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

April 14, 2026

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

April 13, 2026

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

ताज्या घडामोडी

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; ८ गुन्हे उघड, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 17, 2026

धक्कादायक प्रकार.. गावावर ४ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या, चोरट्यांचा डोळा की भलतेच काही घडणार..? गावकरी भयभीत, घरफोड्यांनंतर ग्रामस्थांची झोप उडाली

April 16, 2026

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात ‘या’ आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

April 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group