• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, April 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिजाऊ चौक पोलिस चौकी बनली ‘शोभेची बाहुली’; नियुक्त केलेल्या चारही कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा नाही

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 15, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
254
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

शहरातील शाळा व महाविद्यालयीन परिसर असलेल्या जिजाऊ चौक भागात मुली-महिलांची छेडछाड, टवाळखोरी आणि हाणामारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रयत्नाने पोलिस चौकी मंजूर करण्यात आली होती. या चौकीमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ही पोलिस चौकी सध्या ‘शोभेची बाहुली’ ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिजाऊ चौक हा शहरातील अत्यंत गजबजलेला शैक्षणिक परिसर असून येथे अनेक खासगी शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस आहेत.

त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. गेल्या काही वर्षांत या परिसरात टवाळखोरीचे प्रमाण वाढले असून दुचाकीवरून येणाऱ्या काही तरुणांकडून मुलींची छेडछाड केली जाते. यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. याच मार्गावर बसस्थानकापर्यंतही अशा प्रकारांच्या घटना वाढल्याचे समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस चौकीची मागणी जोर धरत होती. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पोलिस विभागाकडून तीन वर्षांतील गुन्हे, वाढती वाहतूक व अन्य ठाण्यांवरील ताण यांचा अहवाल सादर करण्यात आला आणि अखेर सुमारे दहा महिन्यांपूर्वी जिजाऊ चौक येथे पोलिस चौकी कार्यान्वित करण्यात आली.

या चौकीसाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, या चौकीत चोवीस तास पोलिस कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात दिवसभर एकही कर्मचारी येथे दिसून येत नाही. आदेशानुसार आनंदनगर आणि शहर पोलिस ठाण्यांमधून प्रत्येकी दोन असे चार कर्मचारी दररोज नियुक्त असतात.

तरीही चौकी ओस पडलेलीच असते. आनंदनगर आणि शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारीदेखील चौकीकडे फिरकत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. सध्या या भागात राज्य मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून वारंवार वादावादी आणि भांडणांचे प्रसंग उद्भवत आहेत.

मागील महिन्यात तर याच पोलिस चौकीच्या आवारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली होती. अशा परिस्थितीत पोलिसांची सतत उपस्थिती अत्यंत गरजेची असताना चौकी रिकामी असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दररोज नियुक्त असलेले चार कर्मचारी नेमके कुठे जातात, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पोलिस चौकी केवळ नावापुरती उभारून उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन चौकीत नियमित कर्मचारी नियुक्त करून परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#JijauChowk#police#employees
SendShareTweet
Previous Post

Tuljabhavani temple तुळजाभवानी मंदिर परिसरात पिचकाऱ्या मारणाऱ्या २४ जणांवर धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयातही दोघांना पकडले

Next Post

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात ‘या’ आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

Related Posts

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; ८ गुन्हे उघड, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 17, 2026

धक्कादायक प्रकार.. गावावर ४ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या, चोरट्यांचा डोळा की भलतेच काही घडणार..? गावकरी भयभीत, घरफोड्यांनंतर ग्रामस्थांची झोप उडाली

April 16, 2026

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात ‘या’ आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

April 15, 2026

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

April 14, 2026

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

April 13, 2026

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026
Next Post

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात 'या' आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

धक्कादायक प्रकार.. गावावर ४ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या, चोरट्यांचा डोळा की भलतेच काही घडणार..? गावकरी भयभीत, घरफोड्यांनंतर ग्रामस्थांची झोप उडाली

ताज्या घडामोडी

पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; ८ गुन्हे उघड, ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 17, 2026

धक्कादायक प्रकार.. गावावर ४ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या, चोरट्यांचा डोळा की भलतेच काही घडणार..? गावकरी भयभीत, घरफोड्यांनंतर ग्रामस्थांची झोप उडाली

April 16, 2026

गुन्हेगारीवर नियंत्रण येईना; धाराशिव पोलिस प्रशासनाविरोधात ‘या’ आमदारांची थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार

April 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group