• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, July 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

फिर्याद देण्यासाठी गेलेल्या नागरिकाचा पोलिस निरीक्षकांनीच दाबला गळा; शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 8, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले असून, गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीचाच गळा दाबण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. शहरातील नागरिक राजू कुराडे यांनी हा गंभीर आरोप करत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू कुराडे हे दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी एका प्रकरणात फिर्याद दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी आपली तक्रार नोंदवून घेण्याची विनंती पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्याकडे केली. मात्र, यावेळी दराडे यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांचा गळा दाबल्याचा गंभीर आरोप कुराडे यांनी केला आहे.

या घटनेनंतर कुराडे यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत एमएलसी (मेडिको-लीगल केस) नोंदवली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, यावर अपेक्षित कारवाई न झाल्याचा आरोप करत त्यांनी 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे. राजू कुराडे हे मनसेचे शहर उपाध्यक्ष असून, यापूर्वी इटळकर खून प्रकरणात त्यांनी शहर पोलीस ठाण्यावर गंभीर आरोप केले होते.

त्याचाच राग मनात ठेवून हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुराडे यांनी पोलीस स्टेशनचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास वास्तव परिस्थिती समोर येईल असेही सांगितले आहे.

धाराशिव शहर पोलीस ठाण्याविरोधात मागील काही काळात विविध आरोप होत असल्याचेही समोर आले आहे. झिरो पोलिसांच्या माध्यमातून हप्तेखोरी, अवैध धंद्यांना प्रोत्साहन अशा गंभीर तक्रारी होत असून, त्याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, दिनांक 16 मार्च रोजी पोलीस ठाण्यात एका कायम वादग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करताना दारूच्या बाटल्या आढळल्याचा प्रकारही समोर आला होता. यासंदर्भातील फोटो आणि बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर दराडे यांनी दारूवर केलेल्या कारवाईतील त्या बाटल्या असल्याचे वेळ मारून नेणारे स्पष्टीकरण दिले होते.

मात्र, या प्रकरणातही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने शहर पोलीस ठाणे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता फिर्याद देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरच अन्याय झाल्याचा आरोप समोर आल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस निरीक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #citizen#complaint#policeinspector#Shocking#citypolicestation
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेत मोठा गैरव्यवहार? प्रशासकीय मान्यता व निधी वितरणातील अनियमिततेची आमदार कैलास पाटील यांची मागणी

Next Post

आधार व्हॅलिडेशनच्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरण्याचा प्रश्न गंभीर; शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आधार व्हॅलिडेशनच्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरण्याचा प्रश्न गंभीर; शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

ताज्या घडामोडी

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group