• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Good news धाराशिव जिल्ह्याला नूतन पालकमंत्र्यांचे लवकरच गिफ्ट ?, महामंडळाच्या एमडींना दिले ‘हे’ निर्देश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 21, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

युवा नेते आनंद पाटील यांच्या मागणीवरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सकारात्मक भूमिका

आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्याला नूतन पालकमंत्री म्हणून राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची वर्णी लागली आहे. प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचे अद्याप जिल्ह्यात आगमन झाले नाही, मात्र त्यांनी जिल्ह्याला मोठं गिफ्ट देण्याचे संकेत दिले आहेत.त्यांच्याकडे असलेल्या परिवहन महामंडळाच्या खात्याच्या संदर्भात युवा सेनेचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद पाटील यांनी परिस्थिती अवगत केली. त्यांनी महामंडळाच्या एकूण मोडकळीला आलेल्या बसची अवस्था मांडून जिल्ह्यासाठी 100 नवीन इलेक्ट्रिक बस देण्याची मागणी केली होती.त्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी ही बाब सकारात्मक पद्धतीने मान्य करून महामंडळाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे याबाबत निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.लवकरच जिल्ह्याला 20 इलेक्ट्रिक बस मिळण्याची शक्यता आहे.

आनंद पाटील यांनी मंगळवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत जाऊन भेट घेतली तसेच त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आनंद पाटील यांनी जिल्ह्यातील एकूण रखडलेल्या बस स्थानकाच्या कामांची माहिती दिली. धाराशिव, लोहारा, तुळजापूर येथील बस स्थानकाच्या संदर्भात चर्चा केल्यानंतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एसटी कशा नादुरुस्त आहेत आणि त्याचा प्रवाशी सेवेवर कसा परिणाम होतो आहे,याची सविस्तर माहिती अवगत केली.

जिल्ह्यावर एस टी सेवेच्या बाबतीत कायम अन्याय होत असून, चांगल्या सेवा मिळण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील अंतर्गत प्रवाशी सेवेसाठी किमान 100 नवीन इलेक्ट्रिक बस मिळाव्यात,अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री सरनाईक यांनी सकारात्मक विचार करून खात्याच्या एमडीना याबाबत निर्देश दिले आहेत.त्यामुळे पालकमंत्री म्हणून सरनाईक जिल्ह्याला लवकरच नवीन इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून गिफ्ट देतील,अशी अपेक्षा आहे.

काय आहे आनंद पाटील यांची मागणी ?
आनंद पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हयातील अंतर्गत वाहतुकीने धाराशिव शहर हे लोकांनी गजबजलेले शहर आहे. रोज धाराशिव शहरात आजुबाजुच्या खेडेगावातुन हजारो लोकांची ये-जा होत असते. आणि प्रामुख्याने खेडे गावातील लोक हे परीवहन विभागाच्या गाड्यांचा जास्त वापर करत असतात. त्यामुळे जिल्हात अंतर्गत वाहतुकीसाठी चांगल्या बसेसची आवश्यकता आहे. त्या तुलनेत धाराशिव परिवहन विभागाच्या ज्या बसेस आहेत त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत व खराब अशा आहेत. परिवहन विभागाच्या बसेस या कित्येकदा रस्त्यामध्येच बंद पडलेल्या आढळतात.त्याचा प्रचंड प्रमाणात त्रास व मनस्ताप हा प्रवाशांना होताना दिसतो तसेच बसचे चालक-वाहक यांनाही या वाहन सततच्या बंद पाडण्याचा त्रासाला सामोरे जावे लागते.

बऱ्याचवेळा प्रवासी हे खाजगी वाहनांना प्राधान्य देताना दिसतात आणि अशा खाजगी वाहनांमुळे अपघातही होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या मार्फत माझ्या पत्राची दखल घेवून धाराशिव परिवहन विभागाला 100 इलेक्ट्रिक बसेस मिळण्यात याव्या ही विनंती. या मागणीवरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांना अबाबत विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags: #cmomaharashtra #eknathshinde #devendraphadanvis #ajitdadapawar #Osmanabad #dharashiv
SendShareTweet
Previous Post

दररोज 20 ते 22 किलोमिटर पायपीट, रानोमाळ भटकंती, वाघ टप्प्यात, पण हाती लागेना

Next Post

पुण्याच्या रेस्क्यू टीमला देखील वाघ देतोय चकवा ; वाघाचे रेस्क्यू ऑपरेशन दिवस-रात्र सुरू

Related Posts

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026
Next Post

पुण्याच्या रेस्क्यू टीमला देखील वाघ देतोय चकवा ; वाघाचे रेस्क्यू ऑपरेशन दिवस-रात्र सुरू

चौकशीचा फेरा सुरू: बोगस कामांची बिले काढल्याप्रकरणी समितीने मुख्याधिकारी फड यांच्याकडून माहिती मागवली

ताज्या घडामोडी

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group