• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 16, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
425
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून खरीप २०२५ हंगामातील सुमारे ३३६ कोटी रुपयांची पीक विमा रक्कम तात्काळ वितरित करण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहेत. यासंबंधीची माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (STAC) विमा कंपनीचे आक्षेप फेटाळून लावल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांचे दावे विलंब न करता निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसाठी एकूण ५०४ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र विमा कंपनीने यातील तब्बल ३६८ प्रयोगांवर चुकीच्या पद्धतीने प्लॉट निवड, स्थानिक दबाव तसेच प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचा दावा करत आक्षेप घेतले होते. या आक्षेपांवर जिल्हास्तरीय सुकाणू समितीने (DLSC) सविस्तर सुनावणी घेतली. मुदतीनंतर दाखल करण्यात आलेले १४९ आक्षेप थेट नामंजूर करण्यात आले, तर उर्वरित २१७ प्रयोगांपैकी केवळ १७ प्रयोगांतील आक्षेप वैध मानून संबंधित प्रयोग रद्द करण्यात आले. उर्वरित २०० आक्षेप समितीने फेटाळले. जिल्हास्तरीय आढावा समितीनेही हा निर्णय कायम ठेवला.

यानंतर विमा कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील दाखल केले. नुकतीच कृषी सचिव परिमल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सुनावणी पार पडली. यावेळी कृषी आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीचे दावे खोडून काढले. सुनावणीदरम्यान कंपनीने मैदानी पातळीवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नसल्याचे तसेच प्रतिनिधी वेळेवर प्रयोगस्थळी पोहोचत नसल्याचेही निदर्शनास आले.

अखेर १० मे २०२६ रोजी राज्य समितीने दिलेल्या आदेशात विमा कंपनीने उपस्थित केलेला वाद कोणत्याही तथ्यात्मक किंवा कायदेशीर आधाराविना असल्याचे स्पष्ट नमूद करत कंपनीचे अपील फेटाळून लावले. तसेच सर्व पात्र दावे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही देण्यात आले.

राज्य समितीच्या निर्णयानंतर आमदार राणा पाटील यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना पत्र देऊन विमा रक्कम तातडीने वितरित करण्यासाठी विमा कंपनीला आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १४ मे रोजी आदेश जारी करत कृषी आयुक्तालय आणि ‘YES TECH’ कडून उपलब्ध झालेल्या उत्पादन आकडेवारीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ झाल्यास तो कंपनीचा जाणीवपूर्वक निष्काळजीपणा मानला जाईल आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील बाधित सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३३६ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Order#distribute#cropinsurance#farmers#Information#MLA#RanaPatil
SendShareTweet
Previous Post

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत वाद; महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत वाद; महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group