• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेत वाद; महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 17, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
663
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीच्या वाटपावरून जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. निधीचे वाटप शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार व लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात यावे, तसेच प्रत्येक मतदारसंघातील अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करत शिवसेना (उबाठा) व काँग्रेसच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्तांनाही देण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळांची अवस्था दयनीय झाली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे गावांतर्गत रस्ते खराब झाले असून त्यांची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे असल्याचे सदस्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अशा अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाधिकाऱ्यांनी पाशवी बहुमताच्या आधारे नियमबाह्य पद्धतीने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत ठराव घेतल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे. या ठरावाला विरोध नोंदवून निधीचे समान व न्याय्य वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील प्रत्येक गावात अभ्यासिका सुरू करण्याचा ठराव मांडला होता. या ठरावाला सर्व सदस्यांनी संमती दर्शवली. मात्र, जिल्ह्यातील 40 जिल्हा परिषद शाळांमध्ये गरज नसताना बाथरूम बांधण्याच्या प्रस्तावाला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.

15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक सदस्याला सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित असून तो समान प्रमाणात वितरित व्हावा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी सर्वसाधारण सभेतही केली होती. मात्र निधी वाटपाबाबत साशंकता कायम असल्याने शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या सदस्यांनी निवेदन देत आपल्या मतदारसंघातील प्राधान्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

या निवेदनावर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या गटनेत्या कांचनमाला संगवे, सुमन विठ्ठल सातपुते, तीर्थराज घाडगे, प्रदीप घोणे, रूपाली नागटिळक, डॉ. जितेंद्र कानडे, अश्विनी जवळगे, प्रतीक्षा सुरवसे आणि महेश देशमुख या महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या सदस्यांना न्याय न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा कांचनमाला संगवे यांनी दिला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#ZillaParishad#Members#MahavikasAghadi are
SendShareTweet
Previous Post

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

Next Post

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आज होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे तालुक्याचे लक्ष

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६२ लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group