• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, September 11, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सरकारला तीन इंजिन, पण शेतकरी वाऱ्यावर; आपणच न्याय द्यावा, आमदार कैलास पाटील यांची अनुदानासंदर्भात राज्यपालांकडे मागणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 8, 2023
in सत्ताकारण
0
0
SHARES
55
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी /धाराशिव

सततच्या पावसाचे अनुदान नाही, एप्रिलमध्ये गारपीठ झाली त्याची मदत नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्ह्यात आले आश्वासने दिली अद्याप निधीचा रुपयाही दिला नाही. सरकार आमदार फोडण्यात व राजकीय कुरघोडी करण्यात मश्गुल असून,त्यांना वेळ कधी मिळेल याची शाश्वती नाही, त्यामुळे राज्यपालांनीच शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

आमदार पाटील यांनी म्हटले आहे की,2022 मधील सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.२२२ कोटी ७३ लाखाची रक्कम प्रलंबित आहे. रक्कम २०२२ च्या दिवाळीपुर्वी मिळणे अपेक्षित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० नुसार २२२ कोटी ७३ लाख एवढया प्रस्ताव विभागीय आयुक्तामार्फत ३० ऑक्टोबर २०२२ रोजी राज्य शासनाकडे पाठविला. गतीमान सरकारने तो मंजुर करण्यास तब्बल नऊ महिने लावले. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी साडेआठ हजारनुसार जिल्हयातील दोन लाख १६ हजार शेतकऱ्यांच्या एक लाख ५९ हजार ३८७ हेक्टर बाधित क्षेत्राला १३७ कोटी निधी मंजुर करु शासन निर्णय जुनमध्ये काढला. यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टारी १३ हजार ६०० मिळणारी रक्कम कमी आता साडेआठ हजारावर आणली. तीन हेक्टरची मर्यादा कमी करुन ती दोनवर आणली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या ८५ कोटी ६६ लाख रुपये कमी मिळणार असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले.मार्च व एप्रिल 2023 मध्ये मोठया प्रमाणात गारपीट झाली शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला. नुकसान पाहणी गतीमान सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी केली दौऱ्यावर असताना भरघोस मदतीचे आश्वासनही दिले. शिवाय उपमुख्यमंत्रीसुध्दा पक्षाच्या सभेसाठी आले त्यानी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातील गारपीटीसाठी एक कोटी ३९ लाख व एप्रिलमधील गारपीटीसाठी पाच कोटी ६१ लाख असा एकुण सात कोटीचा प्रस्ताव राज्यशासनाला पाठवला. गतीमान सरकार म्हणवुन घेणाऱ्या राज्य सरकारवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही.

फोडाफोडी करण्यात सरकार व्यस्त

सध्या पेरणीचे दिवस आहेत. २०२२ च्या दिवाळीला मिळणारी नुकसान भरपाईची रक्क्म किमान या तरी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या हातात पडतील ही भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.शेतकऱ्यांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असतानाही डबल इंजीन म्हणवून घेणारे राज्य सरकार सत्तेसाठी आमदारांची फोडाफोडी करुन एक-एक इंजिन जोडण्यात व्यस्त आहे. त्यामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वेळ नाही. डबल इंजीन सरकारला तिसरे इंजिनही जोडले तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच असल्याचे आमदार पाटील यानी राज्यपालांना लिहलेल्या पत्रात सांगितले आहे.आता राज्यपालांनी तरी शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती आमदार पाटील यानी केली आहे.

SendShareTweet
Previous Post

भाई उद्धवराव पाटील यांचे कर्तृत्व, नेतृत्व प्रामाणिक,त्यांच्या विचारांची देशाला गरज

Next Post

अखेर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मान्यता, यावर्षीच सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

Related Posts

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026

नळदुर्ग नगर परिषदेच्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत बिले काढू नका

December 21, 2023

चव्हाण साहेब, 2024 ची विधानसभा निवडणूक आपणच लढवा;72 गावातील कार्यकर्त्यांचा आग्रह

August 19, 2023

आप संघर्ष करो, हम आपके साथ है!

August 7, 2023

तेलंगणात शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्या निर्णयाबद्दल धाराशिवमध्ये BRS कडून फटाके फोडून जल्लोष

August 3, 2023
Next Post

अखेर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मान्यता, यावर्षीच सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात केलेली दहापट दरवाढ स्थगित; पुजाऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाची माघार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group