प्रतिनिधी / धाराशिव
विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार सध्या देशात सुरू आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या बाबतीत असाच प्रकार झाला असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला म्हणून गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल केली गेली असून,या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धाराशिव येथे जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आप संघर्ष करो,हम तुम्हारे साथ है,अशा घोषणा दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. याचा आनंदोत्सव काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. फटाके फोडून व नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी “राहुल गांधी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है..” अशा घोषणा दिल्या. तसेच केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारचा निषेधही करण्यात आला.यावेळी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक बापू शेळके, सरचिटणीस ऍड.जावेद काझी, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते शहाजी मुंडे, भारतयात्री सरफराज काझी, महिला प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, प्रदीप बप्पा घुटे, सलमान शेख, महेश पाटील, अशोक बनसोडे, ऍड.राजू आडे, संजय गजधने, आरेफ मुलाणी, संतोष पेठे, अभिमन्यू रसाळ, विष्णू पेठे, हज्जू शेख इत्यादी सहभागी झाले होते.