• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, January 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

नगरपालिका पराभवानंतरही न डगमगता संघर्षाची नवी प्रेरणा ; खासदार ओमराजे यांच्याकडून साल्हेर किल्ल्यावर यशस्वी हिवाळी मोहीम

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 27, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
556
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याची पार्श्वभूमी असतानाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा पराभव मनाला न लावता पुन्हा नव्या उमेदीने संघर्षासाठी उभे राहण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, जिद्द आणि स्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांकडून नवी ऊर्जा घेण्याचा मार्ग निवडला आहे.

हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा पराक्रम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला. सह्याद्रीच्या अवघड कडेकपाऱ्यांतून, दगडधोंड्यांच्या वाटांवरून चालताना शरीरासोबत मनाचीही कसोटी लागते. मात्र व्यायामाची विशेष आवड आणि कणखर शारीरिक तयारीमुळे ओमराजे यांनी हा कठीण ट्रेक लीलया पूर्ण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर गडावर उभे राहिल्यावर मन अभिमानाने भरून आले आणि स्वराज्याची जाणीव अधिक तीव्र झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शारीरिक थकवा जाणवत असला तरी मन मात्र इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांनी उंच आकाशाला गवसणी घालत होते, असेही त्यांनी सांगितले.

या ऐतिहासिक मोहिमेला आणखी विशेष अर्थ प्राप्त झाला, जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हा पुरस्कार आपल्यावर अधिक जबाबदारी टाकणारा असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ करणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले. साल्हेर किल्ला केवळ उंचीमुळे नव्हे, तर शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासामुळे सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर मानला जातो. अशा ऐतिहासिक स्थळावरून मिळालेली प्रेरणा आगामी काळातील सामाजिक व राजकीय वाटचालीत नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास ओमराजे यांनी व्यक्त केला.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#motivation#wavering#Successful#campaign#Omraje#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

संतापजनक, धाराशिवमध्ये रस्त्याच्या नावाखाली बेसुमार अनधिकृत वृक्षतोड; पालिकेची परवानगी नाही,प्रशासनाचेच बेजबदार कृत्य

Next Post

धाराशिव नगरपालिकेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा नेहा काकडे यांचा आज पदग्रहण सोहळा

Related Posts

दुसऱ्या लग्नाच्या व कुटुंब नियोजनाच्या वादातून मुलाने केला बापाचा खून

January 17, 2026

पुणे महापालिका निवडणुकीत गिरीराज सावंत यांचा ‘इतक्या’ मतांनी पराभव ; ‘या’ कारणामुळे फिरला निकाल

January 17, 2026

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची खरेदी; इच्छुकांनी ‘इतके’ अर्ज केले खरेदी

January 16, 2026

पुणे महापालिका निवडणुकीत गिरीराज सावंत यांचा पराभव

January 16, 2026

धाराशिव नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी लढत; अक्षय ढोबळे यांचा १३ मतांनी विजय

January 16, 2026

मित्राच्या घरात चोरी करणाऱ्या तीन मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

January 16, 2026
Next Post

धाराशिव नगरपालिकेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा नेहा काकडे यांचा आज पदग्रहण सोहळा

देवीचरणी सुवर्ण श्रद्धा; सव्वासात लाख रुपयांचे मंगळसूत्र अर्पण

ताज्या घडामोडी

दुसऱ्या लग्नाच्या व कुटुंब नियोजनाच्या वादातून मुलाने केला बापाचा खून

January 17, 2026

पुणे महापालिका निवडणुकीत गिरीराज सावंत यांचा ‘इतक्या’ मतांनी पराभव ; ‘या’ कारणामुळे फिरला निकाल

January 17, 2026

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची खरेदी; इच्छुकांनी ‘इतके’ अर्ज केले खरेदी

January 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group