• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, August 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 19, 2026
in धाराशिव जिल्हा
0
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने पाच नवीन देवराया विकसित करण्यात येणार आहेत. प्रत्येकी पाच एकर क्षेत्रावर या देवराया साकारल्या जाणार असून, त्यासाठी नामांकित कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून आर्थिक सहभाग घेण्यात येणार आहे. या उपक्रमासंदर्भात आज मुंबई येथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच टाटा मोटर्स, रिलायन्स फाउंडेशन, अशोक लेलँड, इंडियन ऑईल आणि टोयोटा या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक देवराईमध्ये सुमारे २ हजार ५०० देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे पुढील पाच वर्षे संगोपन व संवर्धन केले जाणार असल्याने या उपक्रमातून दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एका देवराईच्या संवर्धनासाठी दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी एका देवराईवर अंदाजे अडीच कोटी रुपये खर्च होणार असून, पाच देवरायांसाठी हा खर्च सुमारे १२.५० कोटी रुपये इतका होण्याची शक्यता आहे. हा निधी CSR च्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात या देवरायांसाठी आवश्यक असलेली जमीन निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि वन विभागाला देण्यात आले आहेत. योग्य जागांची निवड झाल्यानंतर वृक्षलागवड आणि संवर्धनाच्या कामाला गती मिळणार आहे.

‘देवराई’ ही महाराष्ट्राच्या पारंपरिक पर्यावरण संवर्धन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानली जाते. स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, भूजल संवर्धन, मातीची धूप रोखणे तसेच स्थानिक वातावरणाचा समतोल राखण्यास अशा वनक्षेत्रांचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे धाराशिवमध्ये प्रस्तावित पाच देवराया जिल्ह्याच्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. CSR निधी, प्रशासन आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी वृक्षसंपदा निर्माण होण्यास मदत होणार आहे. विशेषतः वृक्षलागवडीसोबतच पाच वर्षांच्या संगोपनाची तरतूद असल्याने लागवड केलेल्या वृक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

SendShareTweet
Previous Post

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

Related Posts

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025

एसआयटीच्या तपासासाठी नगर पालिकेकडे अभिलेखे उपलब्ध नाहीत, सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत लेखा परीक्षण करा

January 24, 2025

लोकसहभागातून वडगावमध्ये साकारतोय भव्य सिद्धेश्वर देवराई प्रकल्प; 300 जातींच्या 10 हजार झाडांची लागवड

September 28, 2024

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group