• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर आमदार राणा पाटील यांनी केली शहरातील रस्त्यांची पाहणी, अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या सूचना

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 16, 2024
in Breaking
0
0
SHARES
175
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

दैनिक आरंभ मराठीने आजच्या अंकात ‘डबक्यांचं शहर,तक्रार ना दखल’ या शिर्षकाखाली धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेची सचित्र बातमी प्रसिद्ध केलअसून, या बातमीनंतर तातडीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज सकाळी अकरा वाजता धाराशिव शहरातील रस्त्यांची पाहणी केली. आरंभ मराठीने विसर्जन विहीर, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,भोसले हायस्कुल आणि जिजाऊ चौक या भागातील रस्त्यांचे फोटो आजच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याच मार्गावर आमदार राणा पाटील यांनी पायी चालत जात पाहणी करून रस्त्याची दुर्दशा पाहिली. त्यांच्यासोबत मुख्याधिकारी वसुधा फड, नगरपालिकेचे अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोरे हे अधिकारी उपस्थित होते.

विसर्जन विहिरीजवळ चालताही येईना

रस्त्यांच्या पाहणीची सुरुवात विसर्जन विहिरीपासून करण्यात आली. रस्त्यावरील राडारोडा आणि चिखल तुडवत राणा पाटील यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची अवस्था दाखवून दिली. रस्त्याच्या मधोमध टाकलेल्या मोठमोठ्या दगडातून लोकांनी मार्ग कसा काढायचा तुम्हीच सांगा? असा सवाल राणा पाटील यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांना केला. यावर फड यांनी माहिती घेऊन कारवाई करते असे मोघम उत्तर दिले. नगर पालिकेचे अभियंता आणि इतर अधिकारी हे शहरातील काम सुरू असलेल्या रस्त्यांची कधीच पाहणी करत नाहीत त्यामुळे कंत्राटदारांवर कोणाचाच वचक नाही असा सूर उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी काढला. यावर राणा पाटील यांनीही पालिकेच्या अभियंत्यांना प्रत्येक कामाची जबाबदारीने पाहणी करा अशी सूचना केली.

अधिकाऱ्यांच्या समोरच तक्रारींचा पाढा
आमदार राणा पाटील यांना पाहताच यशदा मल्टिस्टेट च्या समोरील कॉलनीतील काही नागरिक आणि महिला घराबाहेर आल्या. या रहिवाशांनी रस्ते, लाईट आणि भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. मुख्याधिकारी यांच्या समोरच पालिकेच्या अकार्यक्षमतेचा पाढा नागरिकांनी सुरू केल्यामुळे वसुधा फड निरुत्तर झाल्या. श्री चित्र मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून खुद्द आमदार पाटील देखील निःशब्द झाले.

मुख्याधिकारी अर्ध्यातूनच माघारी
आमदार राणा पाटील यांनी रा. प.महाविद्यालय ते जिजाऊ चौक या रस्त्याची चालत पाहणी केली. याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गटारी तुंबलेल्या आहेत. गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. परंतु या रस्त्याची पाहणी करतेवेळी मुख्याधिकारी फड या उपस्थित राहिल्या नाहीत. भोसले हायस्कूल ते जिजाऊ चौक या भागात जागोजागी तुंबलेल्या गटारीचा तक्रारी नागरिक आणि दुकानदार राणा पाटील यांच्याकडे करत होत्या. जिजाऊ चौकातील मुख्य भागात गटार तुंबल्यामुळे साचलेले पाणी काही नागरिकांनी पाटील यांना दाखवले. परंतु यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत ही समस्या पोहोचली नाही. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी जिजाऊ चौकापर्यंत पाहणी करून समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या,असे नागरिकांचे म्हणणे होते.

अधिकाऱ्यांना सूचना दिल्याविसर्जन विहीर ते जिजाऊ चौक या भागातील रस्त्यांची आणि गटारींची पाहणी केली. काही ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दिसून आले. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि अभियंता तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. रस्त्याची कामे चांगली झाली पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे, शेवटी जनतेचे हाल नाही झाले पाहिजे या भावनेने काम करायला हवे. अधिकाऱ्यांनी सुरू असणाऱ्या कामावर बारकाईने लक्ष देऊन काम करून घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत.

राणा जगजितसिंह पाटील, आमदार

SendShareTweet
Previous Post

‘त्या’ मुलाची बनवेगिरी..14 वर्षीय मुलाने केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; क्रिकेटची अकॅडमी लावण्यास वडिलांचा विरोध असल्याने रागाने गेला होता निघून

Next Post

मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन, धनगर समाजातील तरुणांचे उपोषण स्थगित, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला संवाद

Related Posts

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

May 3, 2026

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

February 25, 2026

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

January 11, 2026

Breaking ५ हजारांची लाच घेताना समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

December 31, 2025

Breaking | तुळजाभवानी मंदिरात तोतया आयएएस अधिकारी पकडला; व्हीआयपी दर्शनासाठी घुसखोरीचा प्रयत्न उघड

December 23, 2025

ब्रेकिंग | धाराशिव जिल्हा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने; उमरगा, कळंब, परांडा शिवसेनेकडे, तुळजापूर–नळदुर्ग–मुरुम भाजपकडे; धाराशिव व भूममध्ये अटीतटीची लढत

December 21, 2025
Next Post

मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन, धनगर समाजातील तरुणांचे उपोषण स्थगित, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला संवाद

बोगस बिले कशी काढली..? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही मुख्याधिकारी फड उत्तर देईनात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

.. अखेर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

May 5, 2026

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

May 3, 2026

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group