• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, February 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करणारे पाच आरोपी जामखेड येथून ताब्यात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 29, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
3.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री (दि.२३) घडला होता. अपहरण करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. यातील पाच मुख्य आरोपींना धाराशिव शहर पोलिसांनी अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून ताब्यात घेतले आहे.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी (दि.२३) सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभा होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली आणि त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली.

सेल्फी काढण्यासाठी ते जवळ गेले असता, त्यांना तसेच गाडीत ओढण्यात आले. गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली. हॉटेलकडून ही गाडी धाराशिव कडे नेण्यात आली. अपहरण करणाऱ्यांकडून मडके यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता असा आरोप नागेश मडके यांनी केला होता.

पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून दिले होते. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते असा आरोप नागेश मडके यांनी केला होता. नागेश मडके हे त्यांच्या पत्नीसह पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासही गेले होते. बंदुकीचे लायसन मिळवण्यासाठी नागेश मडके हे हल्ल्याचा बनाव करत आहेत असा आरोप सोशल मीडियावरून केला जात असल्यामुळे या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात येत होता.

अखेर घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आज जामखेड येथून पाच जणांना अटक केली. यातील चार आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे तर एका आरोपीची तब्येत बिघडल्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपींना अटक केल्यामुळे हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला होता याचे उत्तर मिळणार आहे. पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv#hotelhotelbhagyashree#trending#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पत्नीवर गंभीर आरोप करत पतीची आत्महत्या ; धाराशिव शहरात खळबळ

Next Post

उमरगा-लोहारा तालुक्याला अतिवृष्टी अनुदानाचे 86 कोटी रुपये अखेर मंजूर

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

उमरगा-लोहारा तालुक्याला अतिवृष्टी अनुदानाचे 86 कोटी रुपये अखेर मंजूर

तुळजाभवानी देवीजींचे धर्मदर्शन व पेड दर्शन दहा दिवस राहणार बंद

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group