• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जबरदस्तीने भूसंपादनः शेतकऱ्यांनी रोखली शक्तीपीठ महामार्गासाठीची संयुक्त मोजणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 25, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
197
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

विरोध तीव्र करण्याचा बाधित शेतकऱ्यांचा निर्धार

आरंभ मराठी / धाराशिव

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकार विरोधाला न जुमानता लादत आहे. परंतु, यातील बाधित शेतकऱ्यांनी देखील संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे.

तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी येथे मंगळवारी (दि.२४) संयुक्त मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. दबाव टाकण्यासाठी सहा शेतकऱ्यांना तामलवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन उशिरा सोडून दिले. मात्र शक्तीपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे दिसत आहे.

सहापदरी शक्तीपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यांतून जात आहे. या बारा जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश आहे. यामध्ये धाराशिव तालुक्यातील १७ आणि तुळजापूर तालुक्यातील २ अशा एकूण १९ गावातील शेतकऱ्यांची ४५० हेक्टरपेक्षा अधिक जमीन संपादित केली जाणार आहे.

मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिल्यापासून या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. भूसंपादनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने याला तीव्र विरोध होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी या गावात शक्तिपीठ महामार्गासाठी मंगळवारी (दि.२४) भूमी अभिलेख कार्यालयाकडून संयुक्त मोजणी केली जात होती. मात्र सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला.

यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे भुमापक अधिकारी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच मोनार्क कंपनीचे कर्मचारी यांच्यासोबत तामलवाडी पोलीस ठाण्याचे जवळपास ४० पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना मोजणी करण्यास विरोध असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अधिकारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत होते.

यावेळी अधिकाऱ्यांनी कसल्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. यावर शेतकऱ्यांनी आम्हाला एकही नोटीस आलेली नसून, आमच्या हरकतींवर सुनावणी घेतली नसल्याचे सांगितले.

तसेच मावेजा किती मिळणार याबद्दलही आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे सांगत विरोध दर्शवला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळ बाचाबाची झाली. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या समोर लोटांगण घेत आल्या पावली परत जाण्याची विनंती केली.

मात्र तरीही पोलिसांनी काही शेतकऱ्यांना धमकावल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. त्यातच शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिस सहा शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

शेतकरी एकत्र झाले आणि शक्तिपीठ महामार्ग होवू देणार नाही, असा इशाराच संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्यांनी संयुक्त मोजणी रोखली. सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी मोजणी न करण्याच्या भूमिकेवर ठाम होते.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मोजणी

समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना रेडीरेकनर दराच्या चारपट रक्कम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शेतकऱ्यांना सरकारने अजूनही विश्वासात घेतलेले नाही. शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या हरकतींची सुनावणीच घेतलेली नाही. शेतकऱ्यांना नोटीस न देता संयुक्त मोजणी केली जात असल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे अधिकारीही जमीन संपादन दराबाबत काहीच बोलत नाहीत.

संयुक्त मोजणीचे वेळापत्रक जाहीर; संघर्ष वाढणार

राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंगळवारी (दि.२४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत २० हजार कोटींची तरतूद केली. बारा जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला विरोध असतानाही सरकार मात्र भूसंपादन कराच अशा सूचना देत आहे. धाराशिव जिल्ह्यातील १९ गावातील संयुक्त मोजणीचे वेळापत्रक भूमी अभिलेख कार्यालयाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार १, ७, १४ आणि २१ जुलै रोजी प्रत्येकी चार गावात संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. परंतु, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी याला विरोध करण्याचा निर्धार केला असल्यामुळे पुढील काळात हा संघर्ष अजून वाढणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#farmer#farming#police
SendShareTweet
Previous Post

तेरा वर्षीय बालिकेवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

Next Post

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीत पुन्हा राडा; बाधित शेतकऱ्याने घेतले विष

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीत पुन्हा राडा; बाधित शेतकऱ्याने घेतले विष

कारच्या धडकेत नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group