• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पुन्हा नद्यांना पूर, रस्ते बंद: धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाचे तांडव; 125 मिमीपेक्षा अधिक पाऊस

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 27, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
768
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पुण्याहून एनडीआरएफच्या दोन टीम बोलवल्या

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी (दि.26) रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या एका रात्रीत तब्बल 125 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

विशेषतः भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गावोगावी पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत.

सततच्या पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले असून, काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेत पुणे येथून एनडीआरएफच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत. या पथकांकडून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

मात्र मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मागील दोन दिवसात काही प्रमाणात पाणी ओसरले होते. मात्र, भूम व परंडा तालुक्यातील शेतजमिनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्या आहेत.

मागील पावसातून काही प्रमाणात राहिलेल्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात एकाच रात्रीत सर्वदूर 125 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे हवामान तज्ञ सांगत आहेत. हा धोका आजही कायम असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे.

पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे आणि गोठे पाण्यात बुडाले असून, जनावरांचेही मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, आपत्कालीन पथके आणि स्थानिक स्वयंसेवक युद्धपातळीवर कार्यरत आहेत.

काही गावांतील शाळा तात्पुरत्या निवाऱ्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. नदी-नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी देखील मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

आजही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, कालपेक्षा आज पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात विक्रमी पाऊस कोसळत असून, महाराष्ट्रात सरासरीच्या सर्वाधिक 160 टक्के पाऊस धाराशिव जिल्ह्यात पडला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#rainfall#district#overnight#rains#teamsNDRF#Pune #trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

तुळजापूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली ; चार दिवसात दोन टोळ्या ताब्यात

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करू नका, त्यांचे काम बघा; पत्रकार, विधीज्ञ, राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते पाठीशी, समाजमाध्यमातून पाठिंबा, कार्याबद्दल कौतुक

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करू नका, त्यांचे काम बघा; पत्रकार, विधीज्ञ, राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते पाठीशी, समाजमाध्यमातून पाठिंबा, कार्याबद्दल कौतुक

कोल्हापूर- सांगलीच्या पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत; पण भूम -परंड्याबाबत कोडगेपणा

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group